Asha Sevika sakal
मुंबई

Asha Sevika : आशा सेविकांचे मानधन रखडले ; सरकारची टाळाटाळ,४७६ कोटी थकीत

महाराष्ट्रात जनतेला समर्पित सेवा देणाऱ्या आशा सेविका आणि पर्यवेक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. राज्यातील आशा सेविका आणि पर्यवेक्षकांचे सुमारे ४७६ कोटी रुपयांचे मानधन राज्य सरकारने चार महिन्यांपासून थकवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात जनतेला समर्पित सेवा देणाऱ्या आशा सेविका आणि पर्यवेक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. राज्यातील आशा सेविका आणि पर्यवेक्षकांचे सुमारे ४७६ कोटी रुपयांचे मानधन राज्य सरकारने चार महिन्यांपासून थकवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे मानधन देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप ही संघटनांनी केला आहे.

महाराष्ट्रात एकूण ७४ हजार आशा कामगार आणि चार हजार पर्यवेक्षक काम करत आहेत; तर आशा सेविकांकडून ग्रामीण भागातील झोपडपट्टी, अतिदुर्गम आणि अतिडोंगराळ भागातील गर्भवती महिला, स्तन्यदा मातांना आरोग्य सेवा पुरवतात. त्याचबरोबर एड्स, मलेरिया, डेंगी आदी रुग्णांनाही राज्य सरकारच्या सेवा पुरविल्या जातात. साधारण ५२ ते ५३ प्रकारच्या सेवा त्या देतात. तरीही मानधन नसल्याने आचारसंहितेनंतर आंदोलन केले जाईल, अशा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.

महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक आणि आशा सेविका महासंघाचे सरचिटणीस राजेशसिंह म्हणाले की, सरकार ७८ हजार पर्यवेक्षक आणि आशा सेविकांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून रोखल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुमारे ५५ हजार आशा सेविकांकडून सेवा दिली जाते. त्यांना वेळेवर मानधन देणे ही सरकारची जबाबदारी आहे.

...तर मोर्चा काढू

निष्ठेने काम करणाऱ्या आशा सेविकांना जानेवारी २०२४ पासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक आणि आशा सेविका महासंघाच्या वतीने महाराष्ट्राचे राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त आणि मुंबई महापालिकेतील कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे तातडीने मानधन देण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT