मुंबई

ऍपल कंपनीच्या नावाने बनावट वस्तूंची विक्री; वाशीतील चार दुकानांवर छापे

विक्रम गायकवाड

नवी मुंबई : मोबाईल फोन, लॅपटॉप व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या ऍपल कंपनीच्या नावाने बनावट इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची विक्री करणाऱ्या वाशीतील चार दुकानांवर वाशी पोलिसांनी छापा टाकला. या वेळी सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीच्या बनावट इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू जप्त करण्यात करण्यात आल्या आहेत. वाशी पोलिसांनी याविरोधात बौद्धिक संपदा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

ऍपल कंपनीच्या मूळ उत्पादनासारख्या दिसणाऱ्या बनावट इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू खऱ्या ऍपल कंपनीच्या असल्याचे भासवून त्यांची बाजारात विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे हक्क अमेरिकेन ऍपल कंपनीने ग्रिफीन इंटॅलेक्‍चुअल प्रॉपर्टी सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीला दिले आहेत. त्यानुसार कंपनीने वाशी पोलिसांच्या मदतीने गुरुवारी (ता. 29) सायंकाळी वाशी प्लाझा इमारतीतील रिअल ऍपल शॉप, श्री गणेश मोबाईल शॉप, मोबी वर्ल्ड आणि लॅपटॉप वर्ल्ड या चार दुकांनावर छापे मारून त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूंची तपासणी केली. या वेळी या दुकानामध्ये मॅगसेफ पॉवर ऍडाफ्टर, मोबाईलचे बॅक कव्हर, लाईटनिंग केबल, यूएसबी पॉवर ऍडोफ्टर, इयर पॉड, आयपॉप मिनी, आयपॉड प्रो केस, लाईटनिंग टू यूएसबी केबल, आयफोन बॅक कव्हर, एअर पॉड प्रो व इतर वस्तू असा सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीच्या बनावट वस्तू आढळून आल्या. 

पावणेतीन लाखांच्या बनावट वस्तू जप्त 
ऍपलच्या कंपनीच्या नावाने बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्या जयेश राजाजी गेहलोत (34), बिरजू बहादूर सहानी (36), धवल रमेशभाई पटेल (29) व वासिम नजमेआला अख्तर (23) या चारही दुकानदारांवर वाशी पोलिस ठाण्यात बौद्धिक संपदा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या चारही दुकानात आढळून आलेल्या बनावट वस्तू जप्त करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT