Fraud sakal
मुंबई

Fraud News : मयत व्यक्तीच्या गाळ्याची बनावट कागदपत्राद्वारे विक्री; सहाय्यक आयुक्तासह, सह दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल

मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या व्यापारी गाळ्याची बनावट कागदपत्र तयार करत त्या गाळ्याचा विक्री व्यवहार केला गेल्याची घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या व्यापारी गाळ्याची बनावट कागदपत्र तयार करत त्या गाळ्याचा विक्री व्यवहार केला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीच्या वारसाने याची तक्रार केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणूक प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पालिकेच्या सहाय्यक आयुक्त, सह दुय्यम निबंधक यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोंढेरी येथे राहणारे विक्रम प्रकाश बनकर यांनी यासंदर्भात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विक्रम यांच्या आजोबांच्या नावे कल्याण पूर्व येथील रुक्मिणी देवी सोसायटीमध्ये एक व्यापारी गाळा आहे. या गाळ्याची पालिकेच्या मालमत्ता कर विभागात करदाता म्हणून नोंद आहे. आरोपी चंद्रकांत नामदेव बनकर यांनी गाळा हडप करण्याच्या उद्देशाने मयत इसमाचे नावे बनावट कुलमुखत्यार पत्र तयार केले.

हा दस्तऐवज सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत न करता तो गाळा आपल्या मालकीचा आहे असे दाखवून अरूण पवार, पत्नी मनीषा पवार या दोन व्यक्तिंच्या नावे हस्तांतरित केला. या प्रकरणाची पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयात मालमत्ता विभागात साहाय्यक आयुक्तांच्या आदेशावरून मालमत्ता कर कर्मचाऱ्यांनी नोंद करून घेतली.

महापालिका कायद्यातील कराधान विषयानुसार मालमत्ता कर हस्तांतरणासाठी कुलमुख्यत्यार पत्र, बक्षिसपात्र हे दस्त नोंदणीकृत नसतील, त्यांनी मुद्रांक शुल्क पालिकेला भरणा केला नसेल तर ती कागदपत्रे मालमत्ता कर लावण्यासाठी ग्राह्य धरण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला नाही.

हे माहिती असुनही तत्कालीन साहाय्यक आयुक्त शांतीलाल राठोड, इतर कर विभाग कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांची कोणतीही छाननी न करता ही कागदपत्रे वैध आहेत असे ठरवून बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरित गाळ्याला कर लावला. नियमबाह्य हस्तांतरित केलेल्या गाळ्याला पालिकेने कर लावला.

या फसवणूक प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी ड प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त आणि माजी परिवहन लेखाधिकारी शांतिलाल राठोड, कल्याणचे सह दुय्यम निबंधक पी. एस. केळकर, पालिकेचे तत्कालीन कर अधीक्षक, दोन लिपीक, चंद्रकांत बनकर, अरूण पवार, मनीषा पवार आणि बनावट दस्तऐवज प्रकरणातील साक्षीदार सुकेत शहा यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

2001 पासून बेकायदा गाळ्याचा ताबा घेणाऱ्यांना कराच्या पावत्या दिल्या. आपण मयत आजोबांचे वारस असुनही आपणास अंधारात ठेऊन हा सगळा प्रकार केल्याबद्दल वारस विक्रम बनकर यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक यु. व्ही. जाधव याचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT