मुंबई

ऐकलंत का? पनवेलमध्ये 'राफेल' मिळतेय फक्त 1000 रुपयांत

दीपक घरत

पनवेल ः कामोठे परिसरात चक्क राफेलची विक्री केली जात असून केवळ 1000 हजार रुपयांत तुम्ही राफेल घरी आणू शकता. मकरसंक्रांतीनिमित्त बाजारात विविध प्रकारच्या, आकाराच्या पतंग विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी एक राफेल असून सध्या बच्चे कंपनीपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडूनच राफेलला पसंती दर्शवण्यात येत आहे. 

कामोठेतील एका विक्रेत्याने मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी राफेल या लढाऊ विमानाच्या आकारातील पतंगाची निर्मिती करून विक्रीला ठेवले आहे. कामोठे वसाहतीत सेक्‍टर 9 परिसरात एका गृह उद्योग समुहाकडून चालवण्यात येत असलेल्या दुकानात हे पतंग विक्रीकारिता उपलब्ध आहे. शालेय जीवनापासून केवळ हौशी खातर विविध आकारातील पतंग बनवणारे श्रीकांत रेपाळे यांनी यंदा प्रथमच विक्री करिता पतंगाची निर्मिती केली आहे. रेपाळे यांनी विमानाच्या आकारातील पतंगा सोबत स्माईली, गोल्डन कोटेड पतंग, सिल्वर कोटेड पतंग आशा नावाने विविधरंगी तयार केले आहेत. अगदी एक फुटापासून ते 10 फूट आकार असलेल्या या पतंगांची विक्री 50 रुपयांपासून 1000 हजार रुपयांपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती रेपाळे यांनी दिली आहे. 

श्रीकांत रेपाळे यांच्या पत्नी मागील काही वर्षापासून कामोठे वसाहतीमधील सेक्‍टर 9 परिसरातील भूखंड क्रमांक 17 वर असलेल्या गुरुकृपा अपार्टमेंट येथे गृह उद्योग प्रकल्पच्या माध्यमातून कोकणी पद्धतीच्या पिठाच्या विक्रीचा व्यवसाय करतात. यंदा प्रथमच त्यांनी विविध आकारातील पतंग तयार करून विक्रीला ठेवले आहेत. पतंगाचे आकार आणि स्वरुप ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. 

sale of various kites in Panvel on the occasion of Sankrati

----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT