Mumbai Airport Sakal
मुंबई

मुंबई विमातळावरील सलून सुसाट!

शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी विमानतळ मोठ्या प्रमाणात सलूनचा व्यवसाय वाढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी विमानतळ मोठ्या प्रमाणात सलूनचा व्यवसाय वाढला आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) एक्‍स्‍प्रेस ब्युटी आणि ग्रूमिंग सेवा प्रदान करणाऱ्या एनएस स्टाइल सलूनने प्रतिदिन सरासरी १५ ते २० हजार रूपयांच्‍या विक्रीच्‍या तुलनेत एकाच दिवसात १ लाख रूपयाच्‍या विक्रमी कमाईची नोंद केली. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये सलूनचे उत्पन्न ४०० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ दिसून येत आहे.

शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. परिणामी विमानतळ मोठ्या प्रमाणात विमान प्रवासी भेट असल्याने सीएसएमआयए वरील सलूनचा व्यवसाय वाढला आहे. साधारणता दररोज एनएस स्टाइल सलूनचे व्यवसाय १५ ते २० हजार रुपये प्रतिदिन व्हायचा; मात्र, एनएस स्टाइल सलूनने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी एकाच दिवसात १ लाख रूपयाच्‍या विक्रमी कमाईची नोंद केली. सनी लिओन, राधिका मदन, नोरा फतेही, निक्की तांबोळी, काजल अग्रवाल, अनुषा दांडेकर, राखी सावंत, माहिरा मिश्रा, श्रद्धा आर्य यासारख्या सेलिब्रिटीज विमातलावरील सलूनला भेट देणारे नियमित ग्राहक आहे.

सलूनचे ६५ टक्के ग्राहक पुरुष -

एनएस सलूनच्या ग्राहक वर्गामध्ये ६५ टक्‍के पुरुष आणि ३५ टक्‍के महिला आहेत, ज्यात २० ते ३० ग्राहक दररोज भेट देतात आणि ९५ टक्‍के देशांतर्गत व ५ टक्‍के आंतरराष्ट्रीय प्रवासी असतात. सलून आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सलून कार्यसंचालनांच्‍या सर्व मानक कार्यप्रणालींचे पालन करते. एनएस स्टाइल सलून टर्मिनल १-सी, प्रस्थान, गेट २६ समोर असून दुसरे सलून टर्मिनल २, डोमेस्टिक डिपार्चर, आयरिश कॅफेच्या पुढे आहे.

या आहे सुविधा -

बॉडी मसाज चेअरद्वारे मसाजची सुविधा, फिजिओथेरपिस्टद्वारे फिजिओथेरपी, सलूनमध्ये केशभूषा, शेव्हिंग, फेशियल पेडीक्योर, मॅनिक्युअर, हेअर कटिंगची सुविधा प्रवाशांना पुरविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT