मुंबई

Mumbai : माझ्यावर होणाऱ्या टिकेकडे मी मनोरंजन म्हणून पाहतो; 'ती' माझ्या आयुष्यातली सर्वांत सामान्य केस - समीर वानखेडे!

आव्हानात्मक आणि समाजात बस्तान मांडलेल्या काही घटकांच्या चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवल्याने, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झालेल्या टीकेकडे मी निव्वळ मनोरंजन म्हणून बघतो. माझ्याविरूद्ध खूप मोठी व्यवस्था उभी राहिली. तरीही मी न डगमगता त्यांच्या विरूद्ध उभा राहिलो."

सकाळ वृत्तसेवा

- मोहिनी जाधव

बदलापूर : आव्हानात्मक आणि समाजात बस्तान मांडलेल्या काही घटकांच्या चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवल्याने, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झालेल्या टीकेकडे मी निव्वळ मनोरंजन म्हणून बघतो. माझ्याविरूद्ध खूप मोठी व्यवस्था उभी राहिली. तरीही मी न डगमगता त्यांच्या विरूद्ध उभा राहिलो." असे प्रतिपादन भारतीय महसूल सेवेतील सिंघम अधिकारी समीर वानखेडे यांनी केले.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने बदलापुरात आयोजित शिबिरात ते बोलत होते. यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या केसचा नामोल्लेख टाळत 'ती' माझ्या आयुष्यातली सर्वांत सामान्य केस असल्याचाही वानखेडे यांनी उल्लेख केला.

रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन विषयक व्याख्यान मालिकेचे आयोजन शनिवारी २० जानेवारीला करण्यात आले होते.

या व्याख्यान मालिकेचे पहिले पुष्प देशाचे आय. आर. एस. अधिकारी समीर वानखेडे यांनी गुंफले. या व्याख्यानासाठी ५०० हून अधिक विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वानखेडे म्हणाले की, "स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना एकाग्र मनोवृत्ती आणि आपण ही परिक्षा नेमकी का देतोय?

याची भूमिका तुमच्या मनात स्पष्ट असायला हवी. देशाविषयी प्रेम, प्रामाणिकपणा आणि निःपक्षपाती पण असेल तरच तुम्ही देशासाठी खऱ्या अर्थाने कार्य करु शकाल, तसेच अधिकारी होणं हे राष्ट्रकार्यच आहे.

त्यामुळे अधिकारी झाल्यावर तुमच्यावर कितीही आघात झालेत तरी शांत डोक्याने संविधान मनात ठेवून योग्य ती कृती करावी." यावेळी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांची त्यांनी माहिती दिली.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मी आजवर ३५०० हून अधिक केसेस हाती घेतल्या आहेत. या काळात माझ्यावर खूप दबाव आला मात्र, त्या दबावापुढे मी झुकलो नाही. उलट माझ्यावर झालेल्या टीकेकडे मी मनोरंजन म्हणून पाहिले. राजकीय क्षेत्र, कथित सेलिब्रिटी यांतील काहींनी माझी प्रचंड बदनामी केली. पण त्याच्याकडे लक्ष न देता मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलं."

वानखेडे पुढे असंही म्हणाले की, "काहींना मी मुंबईत नको असल्याने मी चेन्नईत गेलो. पण मी माझ्या देशालाच कार्यक्षेत्र समजतो. त्यामुळे जिथे जाईन तिथे देशाची सेवाच करेन."

यावेळी स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटरचे सर्वेसर्वा राजेंद्र घोरपडे यांनी समीर वानखेडे यांच्या कार्याचे कौतुक करत स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटरच्या कार्याची माहिती दिली. तर, रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष रोटे.

दिनेश म्हस्कर यांनी स्पर्धा परिक्षा विषयक व्याख्यानमालेची रूपरेषा सांगत, क्लबच्या आजवरच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. तुषार साटपे यांनी केले तर, आभार प्रदर्शन डॉ. सुतेजा स्वामी यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक संभाजी शिंदे, किरण भोईर, समाजसेवक साकिब गोरे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष दिनेश म्हस्कर, सेक्रेटरी प्रियंका डुडेजा, प्रकल्प प्रमुख अॅड. तुषार साटपे, उमेश कांबळे, नीतू नंबियार, डॉ. सुतेजा स्वामी, रविंद्र घोरपडे, शशांक राजुलवार, मंगेश हिंदुराव, पुष्कर कर्नावट, वरूण मौर्य, डॉ. रूपाली धवण, डॉ. बिपीन कुमार दुबे, देव शर्मा, ललिता शर्मा, किरण विसपुते, नरेंद्र धोत्रे, संकेत सबनीस आदींनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT