samir wankhede google
मुंबई

Aryan khan drug case: समीर वानखेडेंना तपासातून हटवणार?

समीर वानखेडे दिल्ली एनसीबीच्या कार्यालयात आहेत.

सुरज सावंत

मुंबई : कॉर्डीलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात NCB ने कारवाई केली. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन कारागृहात आहे. या सर्व प्रकरणाचा तपास ज्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला, त्या समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) रोज पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत.

समीर वानखेडे यांचं संपूर्ण कुटुंब मुस्लिम असून त्यांनी शेड्युल कास्टच्या कोट्यातून नोकरी मिळवली असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईलने पलटी मारली असून त्याने २५ कोटीच्या डीलचा आरोप केला आहे. एकाबाजूला नवाब मलिक यांच्याकडून होणारे व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले आणि दुसऱ्याबाजूला साईलची पलटी यामुळे वानखेडे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

एनसीबीनेही वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांची दखल घेतली आहे. समीर वानखेडे दिल्ली एनसीबीच्या कार्यालयात आहेत. या प्रकरणावर अनेकप्रश्न उपस्थित होत असल्याने वानखडे याना या प्रकरणातून हटवले जाण्याची शक्यता आहे.

ज्ञानदेव वानखेडे काय म्हणाले?

"माझा मुलगा महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे शत्रूंच्या चक्रव्यूहात अडकला आहे. अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नव्हता, पण माझा मुलगा यातून मार्ग काढू शकेल याची मला खात्री आहे", असा विश्वास ज्ञानदेव वानखेडे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT