Samir Lokhande sakal
मुंबई

Kalyan Crime : समीर लोखंडे हत्याकांड प्रकरण; भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्याला अटक

कल्याणच्या पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात चार दिवसांपूर्वी 10 जणांनी समीर लोखंडे (वय 17) या मुलाची निर्घृण पणे हत्या करण्यात आली होती.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याणच्या पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात चार दिवसांपूर्वी 10 जणांनी समीर लोखंडे (वय 17) या मुलाची निर्घृण पणे हत्या करण्यात आली होती. समीरच्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी काही तरूणांना अटक केली आहे.

यामध्ये पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीस आकाश जैसवाल याला बेड्या ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोबाईल डमडाट्यात पुरावे सापडल्याने या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सहा महिन्यांपूर्वी विठ्ठलवाडीतील पेट्रोल पंपावर झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरुन शुक्रवारी 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी खडेगोळवलीतील मंगेशी मैदानात समीर लोखंडे याला 10 जणांनी मारहाण केली होती. यानंतर समीर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ज्या मुलाने अन्य तरुणांच्या मदतीने समीरला मारहाण केली होती तो मुलगा देखील अल्पवयीन आहे.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन तरुणांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान या प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरू असताना आकाशचे नाव पुढे आले. पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला असता मोबाईल डमडाट्यानुसार अर्थात सीडीआरच्या माध्यमातून आकाश जैसवाल याचा या हत्याकांडात समावेश असल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आकाश हा भाजपाच्या एका मोर्चात सहभागी होता. तसेच आकाश हा भाजपाचे माजी उपमहापौर विक्रम तरे यांचा निकटवर्तीय असल्याचेही समोर आले. हत्याकांडापूर्वी आकाश हा आरोपींच्या संपर्कात होता. मोबाईल सीडीआरच्या पुराव्यांमुळे आकाश जैसवाल याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली त्यादरम्यान इतर कार्यकर्त्यांची पदे ही बरखास्त झाली होती. त्यामुळे आकाश हा सरचिटणीस नाही परंतु भाजप पदाधिकारी असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT