Sambhaji Bhide mahatma gandhi esakal
मुंबई

Sambhaji Bhide: 'संभाजी भिडे यांचं नाव वगळा'; जनहित याचिकाकर्त्यांना हाय कोर्टाचे निर्देश

Sanbhaji Bhide comment on mahatma gandhi : युक्रांत संघटनेचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मुंबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती

सकाळ डिजिटल टीम

Sambhaji Bhide comment on mahatma gandhi

मुंबई: शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे नाव जनहित याचिकेतून वगळावे असे निर्देश मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. युक्रांत संघटनेचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मुंबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवर सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. मुंबई हाय कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

महान पुरुषांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचे अनेक प्रकरणे आहेत. अशी अनेक प्रकरणे असताना फक्त संभाजी भिंडे यांच्याविरोधातच जनहित याचिका दाखल का? असा प्रश्न कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला आहे. जनहित याचिका केवळ एका व्यक्तीच्या विरोधात दाखल करता येत नाही, अशी टिप्पणी हाय कोर्टाकडून करण्यात आली आहे.

कोर्टाने म्हटलं की, महान पुरुषांच्या संदर्भात काही अवमानकारक किंवा बदनामीकारक वक्तव्य येत असतील तर त्याविरोधात जनहित याचिका होऊ शकते, पण एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जनहित याचिका होऊ शकत नाही, कारण ही जनहित याचिका आहे, असं कोर्टाने म्हटलंय.

'महान व्यक्तींविरोधात वारंवार वादग्रस्त वक्तव्य येत असतील तर त्याला रोखण्यासाठी एखादा कायदा केला जावा. तसेच आयपीसीमधील मानहानीची कलमे 499 आणि 500 यांचा उपयोग होणार नसेल तर ती रद्द करण्यात यावीत, असं युक्रांतचे कुमार सप्तर्षी यांनी म्हटलं होतं.

हायकोर्टाने म्हटलं की एखाद्या व्यक्तीविरोधात जनहित याचिका दाखल केली जाऊ शकत नाही. या याचिकेतील संभाजी भिडे यांचे नाव वगळावे. पण, याचिकाकर्त्ये आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. आपण तुम्हाला जो निर्णय द्यायचा आहे तो द्यावा, आम्ही हे प्रकरण पुढे सुप्रीम कोर्टात न्यायचं का ते ठरवू, असं याचिकाकर्त्यांच्या वकीलांकडून कोर्टात सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT