sand hurst road railway station
sand hurst road railway station sakal media
मुंबई

मुंबई : आरपीएफ महिला जवानाने वाचवले प्रवासी महिलेचे प्राण

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेवरील (central Government) सॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात (sand hurst road railway station) चालत्या लोकलमध्ये चढत असताना वृद्ध महिला (Senior citizen Waman) प्रवासीचा तोल गेला. फलाट आणि लोकलच्या पोकळी खाली जाणाऱ्या महिलेला त्वरित आरपीएफ महिला कॉन्स्टेबलने (RPF) वाचवले. आरपीएफ महिला कॉंन्स्टेबल सपना गोलकर (sapana golkar) यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानमुळे त्या वृद्ध महिलेचा जीव वाचवला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV Footage) झाली असून सर्वत्र महिला कॉंन्स्टेबल सपना गोलकर यांचे कौतुक होत आहे.

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी, (ता.21) रोजी दुपारी 3 च्या सुमारास बदलापूरला जाणारी धीमी लोकल स्टॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर आली होती. नंतर काही मिनिटांत आपल्या गंतव्य स्थानकाकडे ही लोकल रवाना होत होती. लोकलचा वेग धिमा असताना एक वृद्ध महिला प्रवासी धावत लोकलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, लोकलच्या दरवाज्यामधून आत जाणे त्या महिलेला जमले नाही. या दरम्यान त्या वृद्ध महिलेचा तोल गेला. ती खाली पडत होती. रेल्वे फलाट आणि लोकलच्या मधल्या पोकळीत पडत असताना कर्तव्यावर असलेल्या महिला आरपीएफ काँन्स्टेबल सपना गोलकर यांनी समयसूचकता दाखवून त्या वृद्ध महिलेला ट्रेन जवळून खेचून प्राण वाचविले आहे. या महिला काँन्स्टेबलच्या धाडसी कामाची दखल आरपीएफ, मध्य रेल्वे प्रशासन यांच्याकडून घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT