मुंबई

'लोकसभेत कॉंग्रेसला विरोधीपक्षनेतेपदही मिळवता आले नाही'; यूपीए अध्यक्षपदावरून संजय राऊतांचा कॉंग्रेसला सल्ला

तुषार सोनवणे

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अखिल पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचे अध्यक्ष होणार अशा राजकीय चर्चांना उधान आले आहे, यावर 'जर शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष झाले तर, आम्हाला आनंदच आहे.' असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पवार युपीएचे अध्यक्ष होतील या चर्चा सुरू असताना, राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलतना प्रतिक्रिया दिली. 'शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले. तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. परंतु पवार यानी स्पष्ट केले आहे की, या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबत अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळेयाबाबत बोलणे योग्य नाही' 

'देशात कॉंग्रेस मोठा पक्ष आहे , परंतु लोकसभा निवडणूकांमध्ये कॉंग्रेसला विरोधीपक्षनेते पदही मिळवता आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीतीत सर्व विरोधी पक्षांना एकत्रित राहण्यासाठी निर्णय घ्यावे लागती. यामुळे विरोक्षी पक्षांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत केले पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. देशात एक मजबूत आघाडी हवी आहे आहे, त्यामुळे याच या आघाडीचे नेतृत्व मोठ्या कर्तृत्वान नेत्याकडे द्यावी लागेल.' असे सूचक विधानही त्यांनी पवार यांना उद्देशून केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT