मुंबई

स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन 

अर्चना राणे-बागवान

नवी मुंबई - स्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर शौचालये उभारणाऱ्या नवी मुंबई पालिकेने आता महिलांच्या 100 स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यंत्रांसोबत 15 ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रही (इनसिनेरटर) बसवण्यात येणार आहे. 

पालिकेच्या शाळा, पालिका मुख्यालय आणि विभाग कार्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात आले होते. नवी मुंबईत औद्योगिक क्षेत्र व कार्यालये मोठ्या प्रमाणावर असल्याने कामानिमित्त 8 ते 10 तास घराबाहेर राहणाऱ्या स्त्रियांची संख्याही अधिक आहे. त्याचा विचार करून आता सोईसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांतही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवली जाणार आहेत. त्यामध्ये 5 रुपयांचे नाणे टाकून नॅपकिन घेता येईल. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र बसवण्यात येणार आहेत. अन्य स्वच्छतागृहांमध्ये लाल रंगाच्या कचरापेटी ठेवण्यात येणार आहेत. 

स्वच्छता अभियानांतर्गत पालिकेने तीन वर्षांत 550हून अधिक सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. 2018 मध्ये जवळपास 35 नवीन स्वछतागृहे उभारली आहेत. तर 8 स्वच्छतागृहांचे काम सुरू आहे. 

नवी मुंबईतील स्वच्छतागृहांमध्ये या आठवड्यापासून वेंडिंग मशीन बसवण्याचे काम सुरू होईल. महिलांच्या सोईच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी (सीएसआर) अंतर्गत निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- तुषार पवार, उप आयुक्त, पालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट,जहीर शेख अडचणीत; तरुणीच्या नव्या तक्रारीने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar:भविष्यात कागदी नोटांऐवजी डिजिटल कॅश; ‘सीबीडीसी’च्या व्यवहारासाठी इंटरनेटचीही आवश्यकता नाही

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा कायमचा थांबणार लाभ; मेपासून पात्र महिलांनाच दरमहा १५०० रुपये, ‘या’ वेबसाईटवर पाहा तुमचे नाव, वाचा...

Marathwada News: मराठवाड्यातील जलसाठा प्रकल्पांत ५५ टक्के उपयुक्त पाणी; जायकवाडी ५८% भरलेले

Chhatrapati Sambhajinagar: हर्सूल तलावामध्येचार युवकांचा मृत्यू ; दोन मित्रांसह तिघे बुडाले, तर एकाने मारली उडी

SCROLL FOR NEXT