सॅनिटरी कचरा पालिका गोळा करणार
सॅनिटरी कचरा पालिका गोळा करणार 
मुंबई

सॅनिटरी कचरा पालिका गोळा करणार

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या वापरातून निघणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन, डायपर आदी कचरा गोळा करण्याचे काम महापालिका करणार आहे. ऍक्‍शन कमिटी अगेन्स्ट अन्‌फेअर मेडिकल प्रॅक्‍टिस या संस्थेतर्फे "स्मार्ट मैत्रीण प्रकल्प' अंतर्गत नवी मुंबई शहरात ही सुविधा दिली जाणार आहे. शहरातील मॉल्स, बाजारपेठा, उद्याने, सरकारी व निमसरकारी कार्यालये, बॅंका आदी ठिकाणी महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनच्या मशीन तसेच वापरलेले नॅपकिन पॅडस्‌ ठेवण्याची एक सॅनिबिन्सही ठेवण्यात येणार आहे.

शहरात पालिकेतर्फे रोज तब्बल ८०० टन कचरा गोळा केला जातो. हा कचरा तुर्भेतील क्षेपणभूमीवर नेऊन शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. रोजच्या ८०० टन कचऱ्यापैकी तीन टक्के अर्थात २४ टन कचरा हा वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन पॅड, ज्येष्ठ नागरिकांचे व लहान मुलांचे डायपर या बाबींचा असतो. त्यासोबत काही लोकांच्या घरी रुग्ण व लहान मुले असल्यास त्यांची अर्धवट संपलेली औषधे, वापरलेल्या इन्जेक्‍शन व सुयांचा समावेश असतो. हा सर्व कचरा क्षेपणभूमीवर नेऊन विल्हेवाट लावण्याची शास्त्रोक्त पद्धत पालिकेकडे नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा कचरा क्षेपणभूमीवरील डोंगराच्या ढिगाऱ्याखाली साठवला जात होता. 

घनकचरा व्यवस्थापन २०१६ च्या कायद्यान्वये केंद्रीय प्रदूषण मंडळाने सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना सर्व सरकारी यंत्रणांना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने ऍक्‍शन कमिटी अगेन्स्ट अन्‌फेअर मेडिकल प्रॅक्‍टिस या संस्थेची मदत घेतली आहे. या संस्थेतर्फे स्वतःतर्फे शहरात "स्मार्ट मैत्रीण प्रकल्पा'अंतर्गत ११० ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन मशीन तसेच वापरलेले पॅड गोळा करण्याचे सॅनिबिन्स बसवण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती केली जाणार आहे. 

पर्यावरणावर विपरित परिणाम 
सॅनिटरी नॅपकिन हा पेट्रोकेमिकल्स पदार्थांपासून तयार केला जात असल्यामुळे हे वापरलेले पॅड ८०० वर्षांपर्यंत कुजत नाहीत. त्यामुळे त्याचा मानवी शरीरासोबत पर्यावरणावरही विपरित परिणाम होतो. सॅनिटरी नॅपकिनमध्ये पेट्रोकेमिकल्समधून तयार होतात. क्‍लोरीन मारले जाते. त्यामुळे सहा तासांपेक्षा जास्त वापरल्यास गंभीर आजार होऊ शकतात. पर्यावरणात गेल्यास मासे खातात. माशांनी खाल्ल्यामुळे ५८ पैकी ४७ जाती नष्ट झाल्याचे केंद्रीय प्रदूषण मंडळाचा अहवाल आहे. माशांनादेखील कॅन्सर होत आहे आणि ते मासे खाणाऱ्या लोकांनाही कॅन्सर होत आहे. 

शहरातील नागरिकांनी याआधीसुद्धा ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यात मोलाची मदत केली आहे. आता महापालिकेने सुरू केलेल्या वापरलेले सॅनिटरी पॅड गोळा करण्याच्या कार्यात मदत करतील. सोसायट्या आणि वाणिज्य कार्यालये आदी ठिकाणी मशीन बसवण्यात येणार आहेत. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT