मुंबई

रेल्वे स्थानकावरील सॅनिटायझर, मास्कची विक्री करणारी मशीन, प्रवाशांसाठीच अनभिज्ञ

कुलदीप घायवट

मुंबई  : देशभरातील रेल्वे स्थानकावर मास्क, रुमाल, बेड रोल आणि सॅनिटाझर विक्री सुरू आहे. अनेक स्थानकावर यासाठी नवीन स्टॉल तयार करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावर देखील मल्टिपर्पस स्टॉल, जनरल स्टोरवर मास्क, रुमाल, बेड रोल आणि सॅनिटाझर विक्रीस आहे. यासह मास्क, ग्लोज, सॅनिटायझेर विक्री करणारी मशीन देखील आहे. मात्र प्रवाशांना या मशीनचा वापर कसा करायचा, याची इत्यभूत माहिती मिळत नसल्याने मशीनचा वापर फार कमी प्रमाणात होताना दिसून येत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांच्या सुविधेसाठी खासगी कंपनीद्वारे मास्क, सॅनिटायझेर, ग्लोज विक्री करणारी मशीन ठेवली आहे. या मशीनमध्ये पैसे टाकून मास्क, ग्लोज, सॅनिटायझेर मिळते. मात्र प्रवाशांनी या मशीनबाबत अनभिज्ञ आहेत. दरम्यान, 
या मशीनचा वापर  कशाप्रकारे करायचा, याची माहिती फलकावर देण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्ष मशीन वापरताना अडचणी येत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. या मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांला नेमणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया प्रवाशाने दिली. 

एका प्रवाशाने सांगितले की, सीएसएमटीवरून मशीनद्वारे मास्क खरेदी करायचे होते. फलकावर 3 प्ले मास्क 10 रुपये,  एन95 आणि एन95 व्ही मास्क 50 रुपयांचे दाखविण्यात आले आहे. मात्र आतील मास्क 30 रुपयांचे दिसून येत आहेत. त्यामुळे थोडा  गोंधळ उडाला. सुरुवातीला 30 रुपये टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मशीन द्वारे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर  50 रुपयांची नोट टाकून 30 रुपयांचे मास्क खरेदी केले. मात्र पैसे परत आले नाही. मग  20 रुपयांचे गरज नसताना ग्लोज घ्यावे लागले.  त्यामुळे मशीनबद्दल माहिती प्रवाशांना देण्यासंबधी कर्मचारी ठेवणे आवश्यक आहे. 
मशीनद्वारे पैसे परत येण्याची सुविधा मशीनमध्ये केली पाहिजे. त्यानंतर ।मशीनचा वापर वाढेल, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशांने दिली.

Sanitizers at the station, machines selling masks, unaware of passengers

------------------------------------------------------ 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT