मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे बंद करण्यात आलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गुरुवारी केवळ 'मॉर्निंग वॉक'साठी येणा-या नागरिकांसाठी सुरू झाले. त्यानंतर प्रतिसाद आणि नियमावलीचे पालन नागरिक करत असल्याने उद्यान सुरू झाले असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये यांनी दिली.
प्रभातफेरी पहाटे 5.30 ते सकाळी 7.30 वा या वेळेतच सुरू राहील. त्यानंतर सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत हे उद्यान पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी उद्यान बंद राहील. सुचनांचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 8 हजाराहून अधिक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. तर अनेक पर्यटक नॅशनल पार्क पाहण्यासाठी येतात. पार्क बंद असलेल्या काळात तब्बल साडे सात कोटींचे नुकसान झाले. मात्र पार्क सुरू होत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साह आहे.
हे नियम पाळणे बंधनकारक
-----------------------
(संपादन- पूजा विचारे)
Sanjay Gandhi National Park opened tourists Mask and sanitizer compulsory
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.