sanjay kelkar sakal media
मुंबई

अदृश्‍य उद्यानाला मिळाली नव्याने संजीवनी; संजय केळकर यांचा पुढाकार

आमदार संजय केळकर यांनी घेतला पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोलशेत (kolshet) येथील वरचा गाव या भागात १० वर्षांपूर्वी शुभारंभ करण्यात आलेले उद्यान मागील काही वर्षांपासून अदृश्‍य झाले होते. त्यामुळे ते उद्यान (Garden) पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर सोमवारी भाजप आमदार संजय केळकर (Sanjay kelkar) यांनी या उद्यानाची पाहणी करून तत्काळ त्याची दुरुस्ती केली (garden repairing work) आणि आता हे उद्याने पुन्हा अदृश्‍य रूपातून दृश्‍य स्वरूपात आणण्यात आले आहे.

कोलशेत वरचा गाव शहीद किशोर पाटील या नावाने २०११ साली या उद्यानाचा शुभारंभ करण्यात आला होता; परंतु त्यानंतर त्याची अवस्था अदृश्‍य स्वरूपात अशी झाली होती. हे उद्यान अतिशय भकास झाले होते. त्यामुळे लहान मुलांनादेखील या ठिकाणी खेळण्यास जाण्यासाठी भीती वाटत होती. येथे वृक्ष वाढले होते; जंगलाचेच रूप या उद्यानाला आले होते. त्यानुसार या उद्यानाला दोन दिवसांपूर्वी केळकर यांनी भेट दिली होती.

त्यानंतर लोकसहभागातून हे उद्याने विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार सोमवारी या उद्यानाचा पुन्हा कायापालट करण्यात आला. पुन्हा हे उद्यानाचे रूपडे पालटले आहे; परंतु केवळ सत्ताधारी शिवसेना व महापालिका प्रशासन यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे आतातरी जागे व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT