Sanjay Raut esakal
मुंबई

Sanjay Raut Jail: संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद, 'ते' प्रकरण पडले महागात

Sanjay Raut Jail In kirit somaiya Defamation Case: मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आशुतोष मसगौंडे

Latest Political Updates in Marathi: मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.

संजय राऊत यांना न्यायालयाने 15 दिवसांच्या कारावासाची आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती, डॉ. मेधा किरीट सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी दिली आहे.

100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मीरा-भाईंदर येथे शौचालय बांधकाम प्रकरणी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते.

या प्रकरणी 2022 मध्ये राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांशी संबंधीत संस्थेने 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचे आरोप केले होते.

यानंतर मेधा किरीट सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेत संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. तो दावा आता निकाली निघाला असून, त्यानंतर राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

2022 मध्ये संजय राऊत यांनी मुंबईतील मीरा भाईंदर भागात शौचालय बांधण्यात 100 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांच्या एनजीओचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे आरोप निराधार असल्याचे म्हणत घोटाळ्याचे पुरावे मागितले होते. याचा पुरावा संजय राऊत यांनी न दिल्याने किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता.

मेधा सोमय्या यांनी वकील विवेकानंद गुप्ता यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीत राऊत यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक आरोप केल्याचा म्हटले होते आरोप केले होते.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सोमय्या कुटुंबीय असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.

तक्रारीत मेधा सोमय्या म्हटले आहे की, 'आरोपींनी प्रसारमाध्यमांना दिलेली वक्तव्ये बदनामी करणारी आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत माझ्या चारित्र्याला कलंक लावण्यासाठी ही विधाने करण्यात आली आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhar Card : 'यासाठी' आधार कार्ड बाद, लाखो प्रमाणपत्र होणार रद्द, पोलीस तक्रारीचाही इशारा! राज्य सरकारचा नवा GR काय?

सर्फराज खान, अभिमन्य ईश्वरन यांच्यासाठी कसोटी संघाचे दार कायमचे बंद? गौतम, गिलचा त्यांच्यावर विश्वास नाही?

Sangamner Politics: कोणताही माईचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; संगमनेरमधील सभेत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली

भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT