sanjay raut
sanjay raut sakal media
मुंबई

संजय राऊत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवा; भाजप महिला मोर्चाची पोलीस तक्रार

कृष्ण जोशी

मुंबई : भाजप नेत्यांविरुद्ध (BJP leaders) अश्लील तसेच स्त्रीयांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी शेरेबाजी (Abusive language) करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मुंबई भाजप महिला मोर्चातर्फे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine drive police station) नोंदविण्यात आली आहे.

राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना भाजप नेते**** आहेत, असे वक्तव्य दोनदा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी ही तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून भारतीय दंडसंहितेच्या कलम 354 ए (1) व (4), 509, 504,500 नुसार सुयोग्य गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी त्यात केली आहे.

राऊत यांच्या विधानांची क्लीप समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली आहे. त्यांचे वरील शब्द बिभत्स व अश्लील असल्याने माझ्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न करणारे आहेत. तसेच राऊत यांनी वरीलप्रमाणे लैंगिक शेरे मारून भाजपच्या सर्व महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केला आहे व आमची प्रतिमा मलीन केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. नायर रुग्णालयात डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे भाजलेल्या रुग्णांवर त्वरेने उपचार झाले नसल्याची घटना गाजली होती.

त्याबाबत बोलताना भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत अनुचित शब्द वापरल्याचा आरोप आहे. त्यामुळे शेलार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे प्रकरण आता तापत चालले असून हा गुन्हा नोंदविल्याची प्रतिक्रिया म्हणून आज भाजप कार्यकर्त्यांनी राऊत यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुढे कशी वळणे घेईल याबाबत उत्कंठेचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्क की फ्लोरिडा... भारताच्या सराव सामन्याबाबत गोंधळ

Latest Marathi News Live Update : पिंपरीत होर्डिंग कोसळलं, चार दुचाकींचं नुकसान

SCROLL FOR NEXT