Sanjay Raut on PM Modi e sakal
मुंबई

'भाजपचा भगवा भेसळयुक्त, अशा नकली रंगांवर केंद्राचीही बंदी'

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप उडवत असलेले रंग नकली आहेत, असं ते म्हणाले. अशा रंगांवर केंद्र सरकारचीही बंदी आहे, असा टोमणा राऊतांनी लगावला. भाजपच्या रंगात भेसळ आहे. त्यांच्या आरोपांमध्येही भेसळ आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या या रंगांना घाबरत नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. देशभरात होळीचा सण पार पडत असताना राऊतांनी राजकीय रंग उधळले आहेत. (Sanjay Raut )

होळी वर्षातून एकदा येते. मात्र भाजपवाल्यांचा शिमगा दररोज सुरू आहे. महाराष्ट्रात दररोज खड्डे खणता येतील. पण आम्ही ते करत नाही. आम्ही खड्डे खणायला सुरुवात केल्यास त्यास कोणकोण पडेल, हे देखील बघितलं जाईल, असं राऊत म्हणाले.

भाजपच्या दंडात ताकद नाही. त्यांना पाठिमागून हल्ले करण्याची सवय आहे. सध्या गोवा जिंकल्याने त्यांचं मनोबल वाढलं आहे. पण गोवा पोर्तुगीजांना कळलं नाही. इंग्रजांनाही नाही कळलं. त्यामुळे भाजपला आता लवकरच कळेल, असा टोला राऊतांनी लगावला.

राजू शेट्टी सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्याची तयारी संजय राऊत यांनी दाखवली. शेट्टींनी दिल्लीत जंतरमंतरला आंदोलन केलं पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू, असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT