Sanjay-Raut-Attacking 
मुंबई

"संजय राऊतसारख्या बडबड करणाऱ्यांना..."; काँग्रेस नेता आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये स्फोटके सापडली. त्या प्रकारानंतर कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. स्फोटकांच्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIAने चौकशी करत अटक केली. त्यानंतर मनसुख मृत्यू प्रकरणातही सचिन वाझे प्रमुख संशयित आरोपी असल्याची चर्चा आहे. या साऱ्या घटनांमुळे मुंबई पोलीसांची बदनामी झाली. पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. याच दरम्यान, 'सचिन वाझे हा पोलीस दलात पुन्हा आल्याने अडचणी निर्माण करू शकतो हे आधीच सांगितलं होतं', अशी कबुली संजय राऊत यांनी सोमवारी केली. त्यांच्या या वक्तव्याचा संजय निरूपम यांनी समाचार घेतला.

"संजय राऊत यांनी म्हटलं आहे की ते सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात रूजू करून घेण्याच्या मताविरोधात होते. कालपर्यंत तेच सचिन वाझेला इमानदार आणि सक्षम असल्याचं म्हणत होते. असो... त्यांनी हे सांगितलं पाहिजे की सचिन वाझे कोणत्या नेत्याचा आधार घेऊन पुन्हा पोलीस दलात आला. NIAने राऊतांसारख्या बडबड करणाऱ्यांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि वाझेचा वाली कोण? या प्रश्नाची उकल केली पाहिजे", असं ट्वीट संजय निरूपम यांनी केलं.

काय म्हणाले होते संजय राऊत?

"सचिन वाझेला पोलीस सेवेत घेण्याचा निर्णय झाला. त्यावेळीच मी म्हटलं होतं की सचिन वाझेचा इतिहास आणि रेकॉर्ड पाहता हा अधिकारी आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकेल. मी काही नेत्यांशी याबाबत चर्चा केली होती. त्या नेत्यांची मी नावं सांगणार नाही. पण मी अनेक वर्षे गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या प्रकरणांबाबत पत्रकारिता केली आहे. त्यावरून मी हे सांगितलं होतं. पण तो पोलीस दलात आला आणि दुर्दैवाने अशा गोष्टी घडल्या", असा खुलासा संजय राऊत यांनी सोमवारी बोलताना केला.

काही दिवसांपूर्वी सचिन वाझेला मुंबई पोलीस दलातील सुपरकॉप म्हणाणारे संजय राऊत पुढे म्हणाले, "एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कोणताही अधिकारी वाईट नसतो. एखादी परिस्थिती त्या अधिकाऱ्याला वाईट बनवते. जे घडलं ते वाईट घडलं, पण चांगल्यासाठी घडलं. सचिन वाझे प्रकरणातून सरकारला धडा मिळाला. सचिन वाझेबाबत सत्य समोर याचं सत्य समोर येईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकारी म्हणून त्याची पाठराखण केली. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांनीही त्याच्यावर कारवाई केली, हे विसरून चालणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT