Sanjay Raut esakal
मुंबई

Sanjay Raut: ...हे बेकायदेशीर! भाजप नवीन कायदे काढत आहे, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics: महाविकास आघाडीचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीकडे लागले असून, त्यासाठी जागावाटपाबाबत सर्व पक्षांमध्ये एकमत होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच तिन्ही पक्ष मिळून प्रचाराची रणनीती तयार करणार आहेत.

Vrushal Karmarkar

हरियाणाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत , याआधी गुरमीत पॅरोलवर बाहेर आल्याने वारंवार चर्चेत आला आहे . आता गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे . तो पुन्हा 20 दिवसांच्या सशर्त जामिनावर तुरुंगातून बाहेर येणार आहे . यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासाठी सत्ताधारी भाजपला प्रश्न केला आहे.

संजय राऊत म्हणाले की,गुरमीत राम रहीमची आठ वेळा पॅरोलवर सुटका झाली आहे. हे बेकायदेशीर आहे. भाजपकडून काही नवीन कायदे केले जात आहेत. खुनी आणि बलात्कार करणाऱ्याला किती वेळा पॅरोलवर सोडता येईल? तेही निवडणुकीच्या वेळी. ते नंतर येतील. महिलांवरील गुन्ह्यांबद्दल बोला. हे सर्व बोगस आहे, अशा लोकांच्या पाठिंब्यावर त्यांचा पक्ष उभा आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत. आता राऊतांच्या या टीकेवर भाजप काय प्रत्युत्तर करणार याकडे लक्ष आहे.

दरम्यान आज जागावाटपासंदर्भात आज पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मविआचे नेते आज आले होते. हे सर्व पक्ष लोकसभेत आमच्यासोबत होते, त्यामुळे आम्ही काय करणार यावर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत आम्ही काय करू शकतो यावर चर्चा झाली. तसेच प्रत्येक जागेवर भाजपचा पराभव करायचा असल्याने आज चौथ्या दिवशी आमच्यात चर्चा होत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात बैठकांचा फेरफटका सुरू आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये मंथन सुरू आहे. सलग चौथ्या दिवशी बैठक सुरू असून त्यात जागावाटपावर चर्चा होत आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्धव ठाकरे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, खासदार अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार असून, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT