मुंबई

"देवेंद्र फडणवीस एक उत्तम मुख्यमंत्री होते, पण..."

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात सध्या देवेंद्र फडणवीस विरूद्ध महाविकास आघाडी असं द्वंद्व रंगलेलं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस बदली प्रकरणाबाबत दिल्लीला गृहसचिवांची भेट घेतली. या मुद्द्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. "कोणत्याही राजकारणी माणसासाठी राजकीय भाग्य महत्त्वाचं असतं. लोक मुख्यमंत्री होतात पण फडणवील यांना त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. यासाठी राजकीय भाग्याची जोड असावी लागले. फडणवीस यांनी त्यांच्या काळात राज्याचं नेतृत्व उत्तम प्रकारे केल, पण त्यांच्या गाठीशी असलेला अनुभव त्यांनी आता विरोधी पक्षनेता म्हणूनही योग्य प्रकारे वापरला पाहिजे. विरोधी पक्षनेत्याने आक्रमक असावे पण राज्याच्या प्रतिष्ठेच्या मूळावर उठणारा आक्रमकपणा कोणत्याही राजकारणाच्या वर्तणुकीत असू नये", असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी मांडले.

"प्रत्येक सरकारच्या काळात काही चुका होत असतात. पण त्या चुका सुधारण्याची संधी त्या सरकारला देण्यात आली पाहिजे. विरोधकांनी ती संधी दिली पाहिजे. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असणं हे चांगल्या विरोधी पक्षनेत्याचे लक्षण आहे. पण रश्मी शुक्ला प्रकरणात विरोधी पक्ष तोंडावर पडला. त्यांनी ही लढाई महाराष्ट्रातच ठेवायला हवी होती. महाराष्ट्राशी इमान राखायला हवं होते. मला अजूनही असं वाटतं की महाराष्ट्राच्या सीमा विरोधी पक्षाने ओलांडू नयेत. कारण महाराष्ट्र दिल्लीकडे आशेने पाहू लागला तर त्यामुळे सह्याद्रीचे शिखर ओशाळतं", असा भावनिक मुद्दा संजय राऊत यांनी मांडला.

महाविकास आघाडीला काहीही धोका नाही. आमची आघाडी ताकदीने काम करत आहे. राजकारण थोडं हालतंडुलतं असायला हवं. एकमेकांवर टीका-टिपण्णी व्हायलाच हवी. कारण भाजपच्या भाषेत ही लोकशाही आहे. प्रत्येकाने सत्य बोललं पाहिजे. विरोधकांना सध्या राज्य दिसत नाहीत. थेट दिल्ली दिसते. त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. विरोधकांना कोणताही रंग नाही. ते बेरंग आहेत. त्यांना रंग असता तर त्यांनी चांगले रंग उधळले असते. महाराष्ट्र सरकारच्या तंगड्यात तंगडं अडकवू नका. सरकार स्थिर आहे", असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT