मुंबई

"ठाकरेंचे पवारांप्रमाणेच सोनिया गांधींशीही जिव्हाळ्याचे संबंध"

"ठाकरेंचे पवारांप्रमाणेच सोनिया गांधींशीही जिव्हाळ्याचे संबंध" शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद Sanjay Raut Explains CM Uddhav Thackeray Sharad Pawar Sonia Gandhi Political Relationship

विराज भागवत

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद

मुंबई: गेले काही दिवस विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात गाजतोय. हे पद काँग्रेसच्या अखत्यारित असल्याने याचा उमेदवार काँग्रेसच्या सोनिया गांधी ठरवतील असं महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगितले जात आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आशा सत्ताधारी व्यक्त करत आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील कथित विसंवादाचा फायदा भाजपचे राज्यातील नेते घेतील आणि या निवडणुकाच्या माध्यमातून काही वेगळा प्रयत्न करू शकतील अशी चर्चा आहे. या मुद्द्यावर बोलताना, "कोणी कितीही प्रयत्न केले तरीही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच होणार", रोखठोक विधान संजय राऊत यांनी केले. (Sanjay Raut Explains CM Uddhav Thackeray Sharad Pawar Sonia Gandhi Political Relationship)

"सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जर विरोधी पक्षाकडून सकारात्मक प्रयत्न झाले तर ते उपकारच होतील. सध्या कोरोनास्थिती आहे. अशा वेळी ताणाताणी कशासाठी करायची? विरोधकांनी कितीही आरडाओरड केली, कितीही संशय पेरण्याचा प्रयत्न केला तरी अशा स्थितीत विरोधकांना निवडणुकीच मूळीच यश मिळणार नाही. जिंकणार तर आम्हीच!", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांचे सोनिया गांधींशी जिव्हाळ्याचे संबंध

"राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यात कोणताही विसंवाद नाही. उलट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याइतकेच सोनिया गांधींशीही ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कोणताही पेच प्रसंग निर्माण झाला की सोनिया गांधी यांच्या ठाकरे यांची चर्चा होते. तीन पक्षांचे सरकार आहे. अशा वेळी सर्व नेत्यांचा एकमेकांशी चांगला संवाद असतोच", असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

ईडीचे वार म्हणजे पाठीत खंजीर

"ईडीचे वार हे पाठीत केले वार आहेत. आपण समोरासमोर येऊन लढायला हवे. एखादा कारखाना सील केला तर त्या कारखान्यात काम करणाऱ्या अनेक रोजगारांचे नुकसान होते याची नोंद घ्यायला हवी. सत्तास्थापनेत जे नेते अग्रेसर होते त्या लोकांनाच सरकारी यंत्रणांचा त्रास भोगावा लागतो आहे. ईडी आणि सीबीआयने आपापली कामं करावीत. सरकार पाडणं किंवा सरकार पाडण्यासाठी सहकार्य करणं हे त्यांचे काम नाही", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT