Sanjay Raut  Sanjay raut ED action News
मुंबई

Sanjay Raut: कोठडीमध्ये पुन्हा वाढ; न्यायालय ईडीवर नाराज

शिवसेना खासदार संजय राऊतांना दिलासा नाहीच.

सकाळ डिजिटल टीम

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊतांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. राऊतांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे.

संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. मात्र जोवर आरोपपत्राची कॉपी मिळत नाही, तोवर या खटल्याची सुनावणी दैनंदिनरित्या चालणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ईडी कायम आरोपींना आरोपपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे शिवसेना आपल्या अस्तित्वासाठीची कायदेशीर लढाई लढत आहे. पक्षातल्या ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट पक्षातून बाहेर पडला. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यात बंडखोर गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केल्याने पक्ष आणखी कोंडीत सापडला आहे. उद्धव ठाकरेंनी या धक्क्यांनंतर सावध पवित्रा घेत उर्वरित पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरेंना मैदानात उतरवलं आहे.

त्यात आता दसरा मेळाव्याचा मुद्दाही चांगलाच पेटला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनची पक्षाची परंपरा असलेला शिवाजी पार्क मैदानावर भरवण्यात येणारा शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार यावरुन वादंग निर्माण झाला आहे. शिंदे गट आणि सेनेत याप्रकरणी चढाओढ सुरू आहे. अद्याप शिवाजी पार्क कोणाला मिळणार याबद्दल महापालिकेने निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आता शिवसेनेने कोर्टात जाण्याची तयारी दाखवली आहे.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संकटकाळात उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय राऊतांच्या कोठडीत असण्याने पक्षाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT