shiv sena sanjay raut ed case mumbai
shiv sena sanjay raut ed case mumbai sakal
मुंबई

राऊतांचं ईडी कोठडीतून मित्रपक्षांना पत्र; पाठिंब्यासाठी मानले आभार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ईडीकडून अटकेच्या कारवाईनंतर संजय राऊत यांना पाठिंबा जाहीर करणाऱ्या मित्र पक्षांचे राऊत यांनी ईडीच्या कोठडीतून पत्र लिहून आभार मानले आहेत. हे आभार मानताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणुकीचा उल्लेखही केला आहे. (Sanjay Raut letter to allies from ED custody Thanks for the support)

संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. या ठिकाणाहूनच त्यांनी मित्रपक्षांसाठी एक पत्र लिहिलं असून याद्वारे त्यांनी आभार मानले आहेत. ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांनी राऊतांना पाठिंबा दिला होता. ईडीकडून अटक झाल्यानंतर राहुल गांधींसह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी ट्विट करत संजय राऊत यांना पाठिंबा जाहीर केला होता.

दरम्यान, आत्ता राऊतांनी जे पत्र लिहिलं आहे ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना उद्देशून लिहिलं असून यामध्ये ते म्हणतात, बाळासाहेब ठाकरेंची कायमच शिकवण राहिली आहे की, रडायचं नाही लढायचं. 'डू नॉट क्राय, फाईट फॉर व्हॉट इज राईट' या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय. पण जी कारवाई माझ्यावर झाली आहे त्याला सर्वच मित्रपक्षांनी पाठिंबा दिला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT