Sanjay Raut Criticized Raj Thackeray
Sanjay Raut Criticized Raj Thackeray sakal
मुंबई

Sanjay Raut : कोणत्या फाईलमुळे यु-टर्न घेतला? संजय राऊत यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सवाल

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - भाजपने अशी कोणती फाईल दाखवली की ‘त्यांनी’ ‘यूटर्न’ घेतला, असा अप्रत्यक्ष टोला लगावत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अचानक ‘नमोनिर्माणट’ पक्ष का झाला, असा सवालही करत मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे.

अनेक नेते भाजपच्या दबावासमोर झुकले. मात्र आम्ही शरणागती पत्करणार नाही, आम्ही महाराष्ट्राच्या शत्रूशी लढतच राहणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मोदी, शहा महाराष्ट्राचे शत्रू आहे, त्यांना या मातीत पाय ठेवायला देऊ नका’, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.

मात्र, आता त्यांना कोणता साक्षात्कार झाली की ते भूमिका बदलून भाजपला पाठिंबा देत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्राचे शत्रू म्हणणाऱ्यांनाच ते पाठिंबा देत आहेत, आता ते जनतेला काय सांगणार आहेत, असा सवालही त्यांनी केला. अशी कोणती फाईल त्यांना दाखवली की त्यांनी यूटर्न घेतला, असा सवालही त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते भाजपसोबत का गेले, कोणत्या तपास यंत्रणेच्या दबावाखाली गेले, हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यामुळे भाजपसमोर शरणागती पत्करून ते गेले. भाजपचा राजकीय व्यभिचार जगजाहीर असल्याचे वाभाडे त्यांनी काढले.

सरचिटणीसांचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर पक्षातील कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी व्यथित होऊन पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून खदखद व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT