Sanjay-Raut-Ashish-Shelar 
मुंबई

भाजपच्या आशिष शेलारांशी गुप्त भेट? संजय राऊतांनी दिलं उत्तर

भाजपच्या आशिष शेलारांशी गुप्त भेटीच्या चर्चांवर राऊतांचे उत्तर महाराष्ट्राचं राजकारण तापलं असताना शेलार-राऊत भेट झाल्याच्या बातम्या Sanjay Raut Reaction on Secret Meeting with BJP Leader Ashish Shelar

विराज भागवत

महाराष्ट्राचं राजकारण तापलं असताना शेलार-राऊत भेट झाल्याच्या बातम्या

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. या पक्षांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून काही अफवा पसरवल्या जातात. मी काल दिवसभर घरीच होतो. माझी कोणाशीही गुप्त भेट वगैरे काहीही झाली नाही. भाजपचे आशिष शेलार मला जाहीर कार्यक्रमात दोन ते तीन वेळा भेटले आहेत. आम्ही एकत्र कॉफीदेखील प्यायली आहे. पण ते सारं उघडउघड होतं. राजकीय मतभेद असले तरीही वैयक्तिक आयुष्यात सगळ्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण त्यांच्याशी गुप्त भेट वगैरे या साऱ्या अफवा आहेत. असे अफवांचे कारखाने लवकरच दिवाळखोरीत निघतील, अशा शब्दात संजय राऊतांनी आशिष शेलारांशी भेट झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं. (Sanjay Raut Reaction on Secret Meeting with BJP Leader Ashish Shelar)

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुजरातमध्ये गुप्त भेट झाल्याचे वृत्त आले होते. त्या भेटीचा पवारांनी इन्कार केला, तर अमित शाह यांनी, 'काही गोष्टी सार्वजनिकरित्या बोलायच्या नसतात', असं सांगितलं होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत अधिकृत पण वैयक्तिक स्तरावरील भेट झाली. या दोन्ही भेटींच्या चर्चांची धूळ बसेपर्यंत शनिवारी आशिष शेलार आणि संजय राऊत यांच्या भेटीची चर्चा रंगली होती. पण अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

"आशिष शेलार यांच्याशी माझी भेट झाली नाही. अशा अफवा परवणारे लोक कोण आहेत ते साऱ्यांनाच माहिती आहे. अशा अफवांमुळे तीन पक्षांत वाद होतील असं जर विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी समजून घ्यावं की अशाने उलट तीन पक्ष अधिक जवळ येतात. माझ्या काम करण्याच्या पद्धतीने किंवा लेखणीने ज्यांना त्रास होतो ते अशा गोष्टी करून गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही", असेही राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT