Sanjay Raut  e sakal
मुंबई

पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न : संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शरद पवारांच्या (Sharad Pawar) मुंबईतील घरासमोर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या धडक आंदोलनावर शिससेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे आंदोलन अत्यंत दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. तसेच हा अत्यंत चिंता वाटावी असा हा प्रकार असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. (Sanjay Raut Reaction On ST Worker Protest)

एसटी संपाच्या बाबतीत सरकारने मार्ग काढण्यासाठी, तसेच मागण्या मान्य करण्यासाठी सर्व उपाययोजना आणि चर्चा केलेल्या आहेत. तसेच न्यायालयाचा निर्णदेखील त्याच पद्धतीचा असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. याशिवाय आंदोलक कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्याचेही आपल्याला वाटते. तरीही कुठली तरी अन्यात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं आणि एका विशिष्ट गटाची डोकी भडकवतं यासाठी सातत्याने हालचाली करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार यांच्या डोळ्यात खुपतं आणि ज्यामुळं ज्यांच्या पोटात दुखतं असे काही लोकं अशा प्रकारचे कृत्य घडवू पाहत असल्याचे राऊत म्हणाले.

ज्या पद्धतीचे आंदोलन आज आपण पाहिले आणि ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे (Supria Sule) आंदोलकांमध्ये निर्भयपणे गेल्या आणि त्यांनी आंदोलकांशी हात चर्चा केली तसेच त्या हात जोडून आंदोलकांना विनंती करत होत्या. मात्र, ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन आंदोलकांकडून सुरू होतं ते लोकशाहीतील कोणत्याही आंदोलनाला न शोभणारे असून, या आंदोलकांच्या मागे कोण नेते आहेत हे पहावे लागेल, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच राष्ट्रीय गीत वंदे मातरम् चे सादरीकरण

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT