Dipak Kesarkar_Sanjay Raut 
मुंबई

"रडीचा डाव" म्हणणाऱ्या केसरकरांना संजय राऊतांचं उत्तर; म्हणाले, मग तुम्ही...

आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्तुत्वाचा उल्लेखही केला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील शिंदे गट-भाजपचं सरकार हे बेकायदा सरकार असल्याचं सांगत शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याला रडीचा डाव असं संबोधलं होतं. आता केसरकरांच्या या विधानावर संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. (Sanjay Raut reply to Dipak Kesarkar alligations about ShivSena writes letter to Governor)

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "आता कोणाला उत्तरं द्यायची नाहीत पक्षानं यावर उत्तर दिलं आहे. ही आता कायदेशीर लढाई आहे. हा रडीचा डाव असता तर तुम्ही कोर्टात का गेलात? कोर्टानं काय निर्णय दिला हे राज्यपालांना कळवणं आमचं कर्तव्य आहे"

...तर बाळासाहेबांनी खास स्टाईलमध्ये उत्तर दिलं असतं

बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी ब्रम्हा, विष्णू सर्वकाही होते आमच्यासाठी आमच्यासाठी ते तेजस्वी नेते होते. गुरुमध्ये तेज असायला हवं, जो आपले शिष्य, फॉलोवर्सना दिशा देईल ते सर्वकाही बाळासाहेब होते. आमच्यासारखे लाखो शिवसैनिक त्यांना गुरुस्थानी मानतात. एका निष्ठेच्या बंधनानं बाळासाहेबांनी सर्वांना बांधून ठेवलं होतं. मला आजच्या दिवशी आश्चर्य वाटतं की, जो लोक बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडून गेले ते आज म्हणतात बाळासाहेब आमचे गुरु होते. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिलं असतं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठींबा

दरम्यान, शिवसेनेने अधिकृतरित्या भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान शिवसेना कुणाच्याही दबावाखाली भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हटलं होतं. शिंदे आणि भाजपने राज्यात स्थापन केलंलं सरकार हे बेकायदेशीर आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये यासाठी राज्यपालांना पत्र पाठवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

Chhatrapati Sambhajinagar: दुकानातील अंगठी बोटात घालून पळण्याचा प्रयत्न; जयभवानीनगर परिसरातील घटना, अल्पवयीन मुलाला तातडीने पकडले.

SCROLL FOR NEXT