मुंबई

आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, कारण... - संजय राऊत

आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, कारण... - संजय राऊत OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं संन्यास घेण्याचं वक्तव्य Sanjay Raut says we will not allow Devendra Fadnavis to leave politics as he is Big leader of BJP

विराज भागवत

OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं संन्यास घेण्याचं वक्तव्य

मुंबई: राज्य सरकारमधील मंत्रीच ओबीसी आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली असती, तर ओबीसी आरक्षण (OBC Reservation) कायम राहिलं असतं. आता कोरोनामुळे आणखी नवीन निर्बंध लावले जात आहेत. मग अशा वेळी पाच जिल्ह्यांच्या निवडणुका कशा काय होतात? ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात समस्या निर्माण होईल. आमच्या हातात सूत्र द्या. ओबीसी आरक्षण परत आणलं नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर, फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही, असं उत्तर शिवसेना खासदार राऊत यांनी दिलं. (Sanjay Raut says we will not allow Devendra Fadnavis to leave politics as he is Big leader of BJP)

"आम्ही देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांनी अशा प्रकारची विरक्तीची किंवा संन्यास घेण्याची भाषा करणं हा महाराष्ट्राच्या जनतेवर आणि भाजपवर अन्याय आहे. देशात आणि राजकारणात चांगल्या नेतृत्वाची कमतरता आहे. तशातच देवेंद्र फडणवीसांसारखे चांगले नेतृत्व फकीर होण्याची भाषा करत असतील तर ते योग्य नाही. ते लढवैय्या नेते आहेत. त्यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावं. प्रश्न नक्कीच मार्गी लागतील", असे राऊत म्हणाले.

संजय राऊत आणि भाजपा

"गरज पडल्यास मी स्वत: त्यांची भेट घेऊन त्यांना समजावेन की संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका. भाजपला तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे", असेही संजय राऊत यांनी वक्तव्य केले.

"आमचं तीन पक्षांचं सरकार आहे. आमच्या पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. पण आम्ही समान किमान कार्यक्रम म्हणजेच Common Minimum Program (CMP) च्या आधारावर एकत्र आलो आहोत. अधूनमधून भांड्याला भांडे लागत असेल तर तेही बरोबरच आहे. त्यालाच संसार म्हणतात. या आधी शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये भांड्याला भांडी केवळ लागतच नव्हती तर भांडी अक्षरश: फुटत होती. तरीही ते सरकार पाच वर्षे चाललंच ना .... मग त्या मनाने हे सरकार तर अत्यंत उत्तम चाललेलं सरकार आहे. हे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT