Sanjay Raut speaks after NCP Shivsena Press Conference
Sanjay Raut speaks after NCP Shivsena Press Conference  
मुंबई

अजित पवारांना भाजपने ब्लॅकमेल केलं; तेही परत येतील : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपसोबत गेलेले अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आले आहे. तेही कदाचित परत येतील असे आम्हाला वाटते. धनंजय मुंडेही आमच्या संपर्कात आहेत. सरकार आमचेच येणार हे निश्चित आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

संजय राऊत म्हणाले, की चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचा विचार करावा. त्यांनी आपला पक्ष वाचवावा. चोरासारखे ते वागत आहेत, ते चंद्रकांत पाटलांनी पाहावे. हा महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटलांसह भाजपचे 35 आमदार आमच्यासोबत आहेत, असेही आम्ही म्हणू शकतो. आम्हीही म्हणू शकतो गडकरींचा आम्हाला पाठिंबा आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ही पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठिशी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT