Sanjay Raut Tweet on Maharashtra Government Sakal
मुंबई

मविआ सरकार बरखास्त होणार, संजय राऊतांचे स्पष्ट संकेत

सकाळ डिजिटल टीम

विधानपरिषदेच्या निवडणुकीची धूळ खाली बसण्याआधीच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झालाय. एकनाथ शिंदेंनी जवळपास ३५ आमदारांसोबत बंड करत सेनेला आव्हान दिलं. पर्यायाने हे महाविकास आघाडीलाच आव्हान आहे. बच्चू कडू, शंभूराज पाटील यांच्यासारखे मंत्रीही या बंडात सहभागी झाले आहेत. सूरतमधून या सर्वांना पोलीस संरक्षणात आसामच्या गुवाहटीत नेण्यात आलंय. यानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीचं टेन्शन आणखी वाढलंय. (Sanjay Raut on Eknath Shinde)

आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी सेनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदेंना फोन कॉल केल्याचं सांगितलं. दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती राऊतांनी दिली. (Maharashtra Political Crisis)

सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचं ट्वीट राऊत यांनी केलं आहे. यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं स्पष्ट झालंय.

एकतास फोन झाला...जास्तीत जास्त काय होईल? सरकार जाईल

बघू कोणाकडे किती आमदार आहेत, तुम्ही उगाच उतावळे होऊ नका, असा इशारा राऊत यांनी दिला. सध्या आमच्याकडे संख्याबळ आहे. हा आमच्या घरातला विषय आहे. एकनाथ शिंदे आणि अन्य सहकाऱ्यांसोबत माझं बोलणं चालू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर कोणी नाराज आहे असं मला वाटत नाही. एकनाथ शिंदेंबरोबर माझं सकाळीच बोलणं झालंय. आमचा एक तास फोन कॉल झाला. काही समज गैरसमज असतात. पण जास्तीत जास्त काय होईल, तर सरकार जाईल,असं राऊत म्हणाले.

भाजपला सत्ता स्थापन करावंसं वाटत असेल, तर त्यांनी उतावळं होऊ नये. यामुळे ठाकरे सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असं वाटलं तर राखेतून फिनिक्सप्रमाणे भरारी मारण्याचा आमचा इतिहास आहे, असं राऊतांनी खडसावलं आहे.

आज सकाळी एक तास बोलणं झालं आहे. ते मी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. आमचे आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पक्षात कोणावरही त्यांची नाराजी नाही. त्यांच्या काही मागण्या नाहीत. ते शिवसैनिक आहेत. परत येतील, असा विश्वास राऊत यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT