Sanjay Raut on The Kashmir Files Team eSakal
मुंबई

औरंगजेबाच्या कबरीपुुढे... MIM ने दिलेल्या ऑफरवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

ओमकार वाबळे

महाविकास आघाडी सरकार असदुद्दिन ओवैसींच्या एमआयएम पक्षासोबत हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. यावर महाविकास आघाडीतून पहिली प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. (Sanjay Raut)

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर दिल्याचं म्हटलं. यानंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या. अखेर संजय राऊत यांनीच भाजप आणि एमआयएमचं समीकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

एमआयएम हा पक्ष भाजपची बी टीम आहे. त्यांची छुपी युती आहे, असं राऊत यांनी म्हटलं. महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. राज्यात हेच समीकरण राहणार आहे. यामध्ये बाकी कोणीही काही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आम्ही पक्ष आहोत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुढगे टेकतात. त्यामुळे हे नेते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. एमआयएम आणि भाजपची युती असल्याचं सर्वांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पाहिलं आहे.

तिनाची चार चाकं करा - इम्तियाज जलील

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफर दिली आहे. तुमचं तीन चाकांचं सरकार आहे. त्याला एक चाक जोडून चारचाकी बनवा. आम्हाला सोबत घ्या, अशी ऑफर जलील यांनी महाविकास आघाडीला दिली आहे. माझा निरोप वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, असं त्यांनी राजेश टोपेंना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT