Sanjay Raut on CM Uddhav Thackeray Health Sakal
मुंबई

'आँधी से कहो औकात में रहे', ईडीची छापेमारी सुरू होताच राऊतांचं ट्वीट

ओमकार वाबळे

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकार आणि केंद्राच्या हातातील यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. या यंत्रणांचा वापर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी होत असल्याचं त्यांनी म्हटलं. संजय राऊत आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन पुरावे देखील देणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणात चर्चा आहेत. (Sanjay Raut on ED)

ईडीचा पर्दाफाश करणार असल्याचंही ते म्हणाले. मात्र, त्याआधीच मुंबईत ईडीने धाडसत्र सुरू केलं. यामध्ये एक मोठा नेता देखील रडारवर असल्याचं कळतंय. आता संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केल्याने सगळ्यांच्या भुवया आणखी उंचावल्या आहेत. (Sanjay Raut Tweet)

संजय राऊत यांनी दिवंगत शायर राहत इंदौरी यांचा शेर पोस्ट केला आहे. शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम, आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे! या ओळी शेअर केल्याने संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

संपत्ती कराराबाबत ईडीने धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्डचा या करारामध्ये पैसा असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. ईडी आणि एनआयएला ठोस पुरावे मिळाल्यानं या धाडी टाकल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचंही समोर येत आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी ED ची ही कारवाई होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दाऊद कनेक्शन

मुंबईत आज सक्तवसुली संचलनालयाने १० ठिकाणी ठापे टाकले. अंडरवल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकरच्या घरी ही कारवाई सुरू आहे. दाऊदच्या मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारात मनीलाँडरिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. या व्यवहारात महाराष्ट्रातील एका नेत्याचा हात असल्याचा संशय असल्याचा संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT