Sanjay Raut_Uddhav Tahckeray 
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानाच्या पार्श्वभूमीवर राऊत वर्षा बंगल्यावर

'भावी सहकारी' या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर राऊत-ठाकरेंमध्ये खलबतं

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपला मैत्रीची साद घालताना 'भावी सहकारी' असा उल्लेख केला होता. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.

औरंगाबादमध्ये काल मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, "व्यासपीठीवर उपस्थित असलेले आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी" मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं कळतं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना नक्की काय म्हणायचं होतं, किंवा त्यांच्या मनामध्ये काय सुरु आहे. हे जाणून घेण्याच्या उद्देशानेचं संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक पार पडल्यानंतर संजय राऊत भेटीत कुठल्या बाबींवर चर्चा झाली याचा खुलासा करु शकतात. त्यानंतर या भेटीमागील कारण स्पष्ट होऊ शकेल.

दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे जाऊन त्यांची भेट घेतली होती. जवळपास तासभर झालेल्या त्यांच्या या भेटीनंतर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खळबळ सुरु होती. अशीच चर्चा आता पुन्हा एकदा पहायला मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Satara fraud:'बहुलेतील एकाची १३ लाखांची फसवणूक'; बनावट कागदपत्रांद्वारे माेटारीची विक्री, सहा जणांवर गुन्हा

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...

SCROLL FOR NEXT