मुंबई

"ती नटी म्हणते ते POK आहे, आता योगीजी मुंबईत आले आहेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये ?"

सुमित बागुल

मुंबई : योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा चांगलाच गाजतोय. यावर शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर पुन्हा भाष्य केलंय. संजय राऊत माध्यमांना म्हणालेत, "मुंबईचे महत्त्व कुणीही कमी करू शकत नाही, पण मुंबईच्या धर्तीवर कोणी विकास करत असेल, उत्तर प्रदेशसारख्या मागास राज्याचा विकास होणार असेल, तिथे रोजगार निर्मिती होणार असेल, तर आम्ही त्याचं स्वागत करतो. कारण मुंबईवरचा ताण कमी होईल, त्यासंदर्भात योगींना मदत लागली तर आम्ही नक्की करू", असं शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत म्हणालेत.  

"तिथे मागासलेपण जास्त"

"संपूर्ण देशाचा विकास व्हावा आणि उत्तर प्रदेशचा सर्वात आधी व्हावा, कारण संपूर्ण देशावर त्यांचा ताण आहे, तिथे मागासलेपण जास्त आहे, याआधी देखील नोयडायेथे फिल्मसिटी उभी राहिली होती. त्याचं काय झालं? तसा देखील पुनर्विकास त्यांनी करायला हवा. अनेक कलाकार जे जुहू, बांद्रा, पाली हिल तिथे राहतात ते देखील उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होणार का? भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर हणून संबोधलं होतं. आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हे स्पष्ट केले पाहिजे, की योगीजी मुंबईत आले आहेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये, कारण ती नटी म्हणते ते POK आहे." 

उर्मिला मातोंडकर यांच्यामुळे पक्षाला एक नवा चेहरा मिळाला, त्यांचा अभ्यास चांगला आहे,  राज्यपालांना कॅबिनेटने केलेला प्रस्ताव मंजूर करावा लागेल, मला वाटत नाही राज्यपाल कोणते घटनेच्या विरोधात काम करतील, थोडा उशीर होईल, कारण बारा नावांचा तो अभ्यास असतो,  इतका महान अभ्यास असतो, त्यामुळे उशीर होईल पण नक्की सही करतील. 

sanjay raut on yogi aadityanath says yogi should tell is it POK or mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT