मुंबई

'10 वर्षापूर्वींचं बोलू नका; बोलताना 10 वेळा विचार करा' - संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

तुषार सोनवणे

मुंबई - देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद (Bharat bandh) ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी बंद बाबत प्रतिक्रीया दिली आहे.  त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanwis) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. फडणवीसांनी 10 वर्षापूर्वीचे बोलू नये, आजचे बोलावे, आणि बोलताना 10 वेळा विचार करावा असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यासह देशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपवून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच केले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सरकाराच्या काळातही त्यासाठी कायदे केले झाले. त्यांच्याकडून होत असलेला विरोध हा दुटप्पी पणा असून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांत प्रतिक्रीया दिली आहे.

' गेल्या 10 ते 12 दिवसांपासून शेतकरी थंडी वाऱ्याची पर्वा न करता, सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमारेषेवर संघर्ष करतोय. त्याला पाठिंबा देणे देशातीलच नव्हे तर जगातील नागरिकांच कर्तव्य आहे.दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जगातील अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत, सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणे ऐकायलाच हवेय,' असे संजय राऊत यांनी म्हटले.

उत्खनन करायचं म्हटलं की, हे लांबपर्यंत जाईल, तुम्ही 10 वर्षापूर्वींचं बोलू नका आजकाय चाललंय ते पाहा शेतकरी आज रस्त्यावर आहे. आजचा बंद ना शिवसेनेने पुकारला, ना राष्ट्रवादीने, ना तृणमूल काँग्रेसने कोणाच्याही हातात राजकीय झेंडा नाही. आपण विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमीका मांडतोय याचा फडणवीसांनी दहा वेळा विचार करायला हवा. '' अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

Sanjay Rauts criticism of Fadnavis on the issue of Bharat Bandh

-------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT