Sanjay Raut Sakal
मुंबई

भाजपने निष्ठावंतांना डावलले : राऊत

संजय राऊत यांची भाजपवर टीका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - इतर पक्षांतून आलेल्यांनाच भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली असून जे निष्ठावान आहेत, संघ परिवाराशी संबंधित आहेत आणि वर्षानुवर्ष काम करत आहेत, त्यांना डावलण्यात आल्याचे मत व्यक्त करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला आज टोला हाणला.

संजय राऊत म्हणाले, ‘भाजपमध्ये संघाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते अस्ताना शिवसेना, काँग्रेसमधून फिरून बाहेर पडलेल्यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे, याचे मला आश्चर्य वाटते. भाजपमध्ये नाराजी आहे. हा जुना भाजप राहिलेला नाही. बाहेरच्या लोकांनी एकत्र येऊन पक्ष ताब्यात घेतला आहे. शिवसेनेने मात्र निष्ठावंतांना उमेदवारी दिली आहे.’

राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहाव्या जागेसाठी उमेदवार दिल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. राऊत म्हणाले की, ‘‘भाजपला या राज्यात घोडेबाजार करायचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्याकडे तेवढी मते नाहीत. मते असती तर त्यांनी नक्की संभाजीराजेंना उमेदवारी दिली असती. पण भाजपने आधी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा, सहाव्या जागेसाठी उभे करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर वाऱ्यावर सोडले. आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे. पण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT