Mumbai School Bus Not Reachable sakal
मुंबई

विद्यार्थ्यांना घेऊन शाळेची बस दोन तास गायब, मुंबईतील धक्कादायक प्रकार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन गेलेली बस गायब झाल्याचा (Mumbai School Bus Not Reachable) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांताक्रूझमधल्या पोदार स्कूलमध्ये (Potdar School Santa cruz) ही घटना घडली असून मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी थेट शाळेत धाव घेतली होती. तसेच शाळा प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आज मुंबईतील पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांचा शाळेचा होता पहिला दिवस होता. त्यामुळे विद्यार्थी 6 वाजता शाळेत गेले. पण, साडेचारपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे आपली मुलं कुठे आहेत? यासाठी पालकांनी शाळेत धाव घेतली. शाळेच्या म्हणण्यानुसार शाळा साडेबारा वाजता सुटली. त्यानंतर शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन गेली. तरीही विद्यार्थी साडेचारपर्यंत घरी पोहोचले नव्हते, असा आरोप पालकांनी केला आहे. मग, साडेबारा ते साडेचार वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन बस कुठं गायब होती? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पोदार स्कूलमध्ये पोहोचले आणि चौकशी केली.

चार तास गायब असल्याचा आरोप करत पालकांनी शाळेत गोंधळ घातला. शाळा प्रशासनावर पालकांनी आरोप केले आहेत. पण, बस दोन तास उशिरा पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सर्व विद्यार्थी सुरक्षित -

सांताक्रूझमधील विद्यार्थ्यांना घेऊन गायब झालेली बस सापडली असून सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. विद्यार्थी दोन तास उशिरा घरी पोहोचले होते. काही तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थी उशिरा पोहोचले. आता सर्व मुलं आपआपल्या घरी आहेत. कोणीही घाबरून जाऊ नये. शाळा त्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करणार आहे. चालकाला रस्ते माहिती नसल्यानं ही घटना घडली आहे, असं मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी एबीपी माझासोबत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT