मुंबई

हो, ईडीला लोक घाबरतात- सत्यजित तांबे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ज्यांचा काही संबंध नाही, अशा लोकांना सक्त वसुली संचालनालय ( Enforcement Directorate) कारवाई केली जाते, त्यांना अकडवले जाते, त्यामुळे ईडीची भीती, वाटणारच, म्हणून ईडीला लोक घाबरतात (People Afraid of ED) असे विधान युवक काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी 'कॉफी विथ सकाळ' या कार्यक्रमात केले. भाजपच्या इशाऱ्यावरून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांसोबत संबधित व्यक्तींवर केल्या जात असलेल्या ईडीच्या कारवाईवर तांबे यांनी भाजपवर (BJP Party Targets) जोरदार निशाणा साधला. (Satyajeet Tambe statement people afraid of Enforcement Directorate)

गुजरात मॉडेल आणि मोदींनी सांगितलेले अच्छे दिन या दोन भूमिका होत्या. अच्छे दिन मुळे चांगले दिवस असे लोकांना वाटत होते, पण आज परिस्थिती काय झाली? सत्तेबाहेर बाहेर काढण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची. लोकांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे इडी आणि इतर माध्यमातून केंद्राकडून दाखवली जाणारी भीती ही लोकांची भीती जाईल, असेही तांबे म्हणाले.

आम्ही राज्यात सत्तेत शिवसेनेसोबत आहोत, मात्र यापूर्वी एकत्र येण्यासाठी ज्यांचा आमचा कधी संबंध आला नाही, त्यांच्यासोबत आम्ही सत्तेत बसलोय. त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे अनेकदा जुळत नाही, त्याला थोडा वेळ लागेल, नवीन संसार झाल्याने जमायला थोडा वेळ लागेल, असेही तांबे यांनी सांगितले. आम्ही विधानसभा निवडणुका दरम्यान युवकांचा जाहीरनामा काढून, अनेक प्रश्न, समोर आणले होते. परंतु,आमचे सरकार सत्तेत आले आणि लगेच काही दिवसात कोवीड आले, त्यामुळे अनेक योजनांना फटका बसला,अनेक विषय सोडवता आले नाहीत अशी कबुलीही तांबे यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT