Savarkar Gaurav Yatra bjp shinde shiv sena mumbai opeartion kamal bmc politics
Savarkar Gaurav Yatra bjp shinde shiv sena mumbai opeartion kamal bmc politics  esakal
मुंबई

Mumbai News : मुंबईत भाजपाचे "ऑपरेशन कमळ"

विष्णू सोनवणे

मुंबई - गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेत असलेली शिवसेनेची सत्ता उलथवून मुंबई एकहाती जिंकण्यासाठी "ऑपरेशन कमळ" प्रभावीपणे राबविण्यास भाजपाने सुरूवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे भाजपाच्या निशान्यावर आहेत. ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती पुसून टाकण्यासाठी भाजपा आणि शिवसेना (शिंदे) एकवटले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा, धार्मिक सण आणि उत्सवांच्या माध्यमातून भाजपा सहा लोकसभा आणि 36 विधानसभा मतदार संघ पिंजून काढणार आहे. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने या लढाईची सुरूवात झाली आहे.

पश्चिम उपनगरात भाजपाची मोठी ताकद आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात खासदार गोपाळ शेट्टी हे भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्या मतदार संघात आज भव्य गौरव यात्रा निघाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या यात्रेचे नेतृत्व केले. उत्तर मध्य मुंबईत खासदार प्रिया दत्त याचे वर्चस्व होते.

आता भाजपा खासदार पूनम महाजन या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कॉंग्रेसने हा मतदार संघ गमावला आहे. सद्या येथे भाजपाने पाय रोवले आहेत. उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे खासदार गजाजन किर्तीकर आता हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामिल झाले आहेत. यात्रेच्या माध्यमातून हा मतदार संघ भाजपा पिंजून काढत आहे.

दक्षिण मध्य मुंबईत खासदार राहूल शेवाळे हे शिंदे गटात आहेत तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ भाजपाकडेच आहे. तेथे भाजपाचे खासदार मनोज कोटक आहेत. मुंबईतील सहा मतदार संघापैकी फक्त दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात अरविंद सावंत हे एकमेव शिवसेनेचे (ठाकरे) खासदार आहेत. हा एकमेव मतदार संघ ठाकरे यांच्या ताव्यात आहे.

गौरव यात्रेमध्ये भाजपाचे महाराष्ट्र मुंबई जिल्हा पदाधिकारी, मंडळ, वॉर्डांचे सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्रे, बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख, त्या त्या विभागातील सामाजिक संस्थांना भाजपाने सहभागी करून घेतले आहे. विधानसभा आणि लोकसभा मतदार संघांवर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाने मुंबईची सत्ता एकहाती मिळविण्यासाठी "ऑपरेशन कमळ" राबविण्यास सुरूवात केली आहे.

दक्षिण मुंबई राखण्याचे शिवसेनेपुढे आव्हान

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे (ठाकरे) खासदार अरविंद सावंत हे एकमेव खासदार असून हा मतदारसंघ राखणे शिवसेना (ठाकरे) यांच्यासाठी मोठे आव्हान आहे. येथेही भाजपाने ताकद लावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT