sandeep 1.jpg 
मुंबई

नालेसफाईत मोठा घोटाळा? 'विरप्पन गॅंग'वर कारवाईची मनसेची मागणी

कार्तिक पुजारी

मुंबई महापालिकेचा 104 टक्के नालेसफाईचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत नालेसफाईत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेचा 104 टक्के नालेसफाईचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत नालेसफाईत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. साकीनाका येथील नालेसफाईचा व्हिडिओ दाखवत नाल्यातील गाळ नाही तर डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांनी केली असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. (scam in Nallesafai MNS sandeep deshpande demands action shivsena)

मनसेने साकीनाका येथील व्हिडीओ सादर केला आहे. डंपरमध्ये डेब्रिज भरलं जातय आणि वरच्या थरात गाळ टाकला जात आहे. अशाप्रकारने डेब्रिजची वाहतुक कंत्राटदारांकडून केली जात आहे. गाळाचे वजन वाढविण्यासाठी कंत्राटदाराकडून हा प्रकार केला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत नाले सफाईत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला.

मुंबई महापालिकेत जे विरप्पन बसले आहेत त्यांच्यावर करवाई करण्याची हिंमत महापौर यांनी दाखवावी. मुंबई महापालिकेतील विरप्पन गॅंगची चौकशी करा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडे यांच्या या गंभीर आरोपानंतर शिवसेना काय पाऊलं उचलते हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, नाल्यातील गाळ काढण्यासाठी दरवर्षी कंत्राट दिले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake reasons: महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 29 भूकंप! काय आहेत कारणं? मुंबईला धोका आहे का? तज्ज्ञ काय सांगताएत?

जलपर्णीतून बायोसीएनजी, प्लास्टिकमधून क्रूड ऑइल...गडकरींनी प्रदुषणावर सांगितला उपाय

Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

Marathi News Live Updates : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, संतप्त नागरिकांचा भावडी रोडवर रास्ता रोको

Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

SCROLL FOR NEXT