School sakal media
मुंबई

BMC : महापालिकेच्या शाळांमध्ये वर्गात 25 विद्यार्थ्यांना प्रवेश

- समीर सुर्वे

मुंबई : शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे (school and colleges) आठवी ते 12 वी पर्यंतचे वर्ग 4 ऑक्टोबर पासून भरणार आहे. मात्र, वर्गात फक्त 25 विद्यार्थ्यांना प्रवेश (students admissions) देण्यात येणार असून त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यी संख्या असल्यास एक दिवसाआड या पद्धतीने प्रवेश देण्यात यावा, असे आज ठरविण्यात आले आहे. तसेच, शाळेत कोविड नियमावलीचे (corona rules) पालन होत आहे का नाही याची अचानक भेटी देऊन पाहाणी करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितले.

राज्य सरकारने 4 ऑक्टोबर पासून आठवी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार महानगर पालिकेच्या सर्व शाळाचे शनिवार(ता.2) पर्यंत निर्जुंतुकीकरण होणार आहे.तसेच,खासगी शाळांनाही उद्या पर्यंत निर्जुंतुकीकरण करुन घेणे बंधनकारक आहे.त्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्याही स्वच्छ करण्यात येत आहेत.विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थीतीची अट शिथील करण्यात आली आहे.

तर, कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षीत अंतर ठेवण्यासाठी वर्गात फक्त 25 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.आवश्‍यकता असल्यास एक दिवसाआड प्रवेश देण्यात येईल. शाळा सुरु झाल्यावर मुले एकत्र खेळणार नाही, डब्बा खाणार नाही याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. महापौरांनी आज पालिका शाळांचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालकांशी संवाद साधला.

-नियम पाळले जातात का नाही याची खात्री करण्यासाठी अचानक भेटी.

-शाळेसोबत आरोग्य केंद्र सलग्न करणे आवश्‍यक.

-आठवड्यातून तीन वेळा शाळांचे निर्जुंतूकीकरण

-आजारी मुलांना प्रवेश नाही.

पाससाठी प्रयत्न

काही शाळांमध्ये विद्यार्थ्यी लोकल ने प्रवास करुन येतात.त्यांच्या रेल्वे प्रवासाची अडचण आहे.ही अडचण सोडविण्यासाठी राज्य सरकार बरोबर पत्रव्यवहार करु असेही महापौरांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

SCROLL FOR NEXT