school bus accident girl dies school trip canceled police hospital esakal
मुंबई

Nalasopara News : सहलीसाठी भावाला सोडायला आलेल्या बहिणीचा शाळेच्या बस अपघातात मृत्य

शाळेमार्फत आयोजित केलेल्या सहलीत जाणाऱ्या आपल्या भावाला सोडण्यासाठी आलेल्या बहिणीच्या शाळेच्या बसला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार ता. 30 रोजी सकाळी 7 वाजता विरार मध्ये घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : शाळेमार्फत आयोजित केलेल्या सहलीत जाणाऱ्या आपल्या भावाला सोडण्यासाठी आलेल्या बहिणीच्या शाळेच्या बसला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार ता. 30 रोजी सकाळी 7 वाजता विरार मध्ये घडली आहे.

या अपघातात बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने शाळा आणि परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला असून, शाळेने सहलही रद्द केली आहे. सिद्धी फुटाणे ( वय 19) असे अपघातात मयत झालेल्या बहिणीचे नाव असून, ही 5 वित शिकणाऱ्या भावाला घेऊन सहलीसाठी शाळेत घेऊन आली होती.

विरार पूर्वेच्या गोपचरपाडा परिसरात नरसिंह गोविंद वर्तक ( एन जी व्ही) ही शाळा आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल आज मुंबईत जाणार होती. त्यामुळे सिद्धी ही आपल्या भावाला घेऊन शाळेत आली होती.

सर्व मुले बसमध्ये बसली आणि पालक आपल्या मुलांना निरोप देण्यासाठी उभे होते. यावेळी शाळेच्या बस चालकाने बस मागे घेत असताना, ती बस बाजूच्या भिंतीला आदळली. यावेळी पाठीमागे उभी असलेल्या सिद्धीलाही त्याचा धक्का लागला आणि बसच्या धडकेत भिंत ही तिच्या अंगावर कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली होती.

जखमी अवस्थेत तिला विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सिद्धी फुटाणे या तरुणीचे वडील मुंबई पोलीस दलात आहेत. या घटनेमुळे शाळेवर शोककळा पसरली आहे. सहल रद्द करण्यात आली असून विरार पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Team India WTC Final Scenario: टीम इंडिया फायनलमध्ये जाणार की नाही? ICC ने सोपं गणित मांडून गुंता सोडवला की वाढवला?

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

Viral Video: इथं कधीही फोटो काढू नका… क्षणात गिळंकृत करणारा पृथ्वीवरील जीवघेणा स्पॉट, इथं उभं राहणंही धोकादायक

Maharashtra’s Traditional Jewelry: महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT