मुंबई

सहलीला निघालेल्या स्कुल बसचे ब्रेक फेल....

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : बेतूरकर पाडा येथे स्कूल बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत बस झाडावर आदळून शनिवारी अपघाताची घटना घडली. अपघातात बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शाळकरी विद्यार्थी वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून अपघातप्रकरणी दुर्घटनाग्रस्त बस चालकाविरोधात कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (ता. १४) कल्याण पश्‍चिममधील बेतूरकर पाडा परिसरमधील कमलादेवी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सहल निघाली होती. मात्र ही बस रस्त्यात बंद पडल्याने शाळेच्या प्रशासनाने कल्याणमधील प्रसिद्ध मुथा कॉलेजमधील बस मागावली होती. मुथा कॉलेजची बस कमलादेवीच्या २३ विद्यार्थ्यांना घेऊन गोल्डन पार्क येथून प्रेम ऑटो सर्कलमार्गे टिटवाळाच्या दिशेने निघाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास बिर्ला कॉलेज परिसरात बसचा ब्रेक फेल झाल्याचे वाहनचालक अर्जुन भालेराव (६०)  यांच्या लक्षात येताच त्यांनी बाजूला असलेल्या झाडाला ठोकर देऊन बस थांबवली.

ही बतामी वाचा ः राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यात हे बदल
या अपघातात वाहनचालकाच्या बाजूने असलेला बसचा समोरील भाग चक्काचूर झाला. दरम्यान, अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  याबाबत पोलिसांनी बसचालक अर्जुन भालेराव ( ६०) यांच्याविरोधात महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील 
तपास पोलिस हवालदार निवृत्ती गोडे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT