मुंबई - स्कूलबस चालकांचा संप असल्याने शुक्रवारी मुलांना शाळेत सोडणे-आणण्यासाठी पालकांना जावे लागले.
मुंबई - स्कूलबस चालकांचा संप असल्याने शुक्रवारी मुलांना शाळेत सोडणे-आणण्यासाठी पालकांना जावे लागले. 
मुंबई

स्कूल बस नसल्याने पालकांची धावपळ

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ आणि टोलमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने देशभरात संप पुकारला आहे. स्कूल बस ॲण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने संपात सहभाग घेतल्याने शुक्रवारी (ता. २०) मुंबईतील अनेक शाळांची बस वाहतूक बंद होती. परिणामी विद्यार्थ्यांची पळापळ आणि पालकांची धावपळ झाली. नोकरीधंदा सोडून त्यांना मुलांना शाळेत पोहचवावे लागले. पर्यायी व्यवस्था नसल्याने काही विद्यार्थ्यांची शाळेला दांडी झाली. ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने पुकारलेल्या संपात सर्व खासगी वाहतूकदारांनी सहभाग घेतला आहे. बंदमध्ये स्कूल बस आणि खासगी बससह खासगी कॅब, ट्रक, टेम्पो आदी वाहनेही सहभागी झाली आहेत.  स्वतःच्या बस असलेल्या शाळांनी संपात सहभाग घेतला नाही. मुंबईतील २८६९, ठाण्यातील २८५२ आणि पनवेलमधील २२१० स्कूल बसची नोंदणी करण्यात आलेली आहेत. एकूण आठ हजार स्कूल बस आज मुंबईत धावल्या नसल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.

स्कूल बसचालकांच्या मागण्या 
     मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्‍यांवर स्कूल बसना टोलमाफी द्या
     पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीअंतर्गत आणा
    इंधनाचे दर सहा महिन्यांतून एकदा निश्‍चित करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT