Mumbai Train
Mumbai Train sakal media
मुंबई

शाळा, सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरू; लोकल प्रवासाचे काय?

कुलदीप घायवट

मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला शाळा सुरू (school starts) होण्याचा निर्णय झाला आहे. तर, महाविद्यालयेही (colleges) ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यासह सिनेमागृहे, (theaters) नाट्यगृहे 22 ऑक्टोबर रोजी सुरू होण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी केली आहे. मात्र, अद्याप लोकल सुरू करण्याबाबत सरकारकडून (mva government) स्पष्ट निर्णय जाहिर झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सिनेमागृहे, नाट्यगृहे क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे.

राज्य सरकारकडून 15 ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांनी लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे कोरोना लसधारक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा सध्या लोकल प्रवास सुरू आहे. मात्र, ज्या महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सिनेमागृहे, नाट्यगृहे क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे दोन डोस झाले नाही, त्यांना लोकल प्रवास करण्याची अडचण निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून ज्या विभागांतील, क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची सूचना दिली जाईल. त्यांना लोकल प्रवासाची अनुमती दिली जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

कोरोनाचा पहिला डोस कोव्हिड शिल्डचा घेतलेल्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 84 दिवसांनी दुसरा डोस आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना दोन ते अडीच महिने लोकल प्रवासापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील महिन्यात कोरोनाची संख्या लक्षात घेऊन, सरकारच्या निर्णयामध्ये त्याप्रमाणे बदल होऊ शकतात, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

"सध्या दोन डोस घेतलेल्या लसवंतांना लोकल प्रवास सुरू आहे. 18 वर्षीय तरूणांनी कोरोना लस घेण्याची टक्केवारी बऱ्यापैकी आहे. ज्या तरूणांचा दुसरा डोस बाकी असेल, त्यांना मंगळवारी, (ता.28) रोजी महापालिका, राज्य सरकारचे सेंटरवर वाॅकिंग पद्धतीने दुसरा डोस मिळेल. यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आधारकार्ड, ओळखपत्र, पहिल्या डोसचे प्रमाणपत्र आणावे लागेल. कोव्हिड शिल्डचे प्रमाण असल्याने हे डोस अधिक आहेत. दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर लोकल प्रवास सुरू होईल. तर, सिनेमागृहे, नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवर कोरोनाचे डोस घेता येतील."

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, बृन्ह्मुंबई महापालिका

"कोरोनामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षणाला मुकले आहेत. त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शाळा उघडणे गरजेचे होते. परंतु विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा-महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास खुला करून देणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे, सर्व शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यायला हवे. त्यासाठी विशेष लसीकरण मोहिम राबविल्या गेल्या पाहिजेत. शाळेच्या सॅनिटायझेशन व सामायिक अंतराकडे लक्ष दिले पाहिजे."

- रोहित ढाले, राज्य कार्याध्यक्ष, छात्रभारती विद्यार्थी संघटना

"रेल्वे प्रशासनाला राज्य सरकारकडून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांना लोकल प्रवास सुरू करण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत. त्यामुळे ज्यांचे दोन डोस झाले नाहीत. त्यांना शाळा, महाविद्यालयापासून मुकावे लागेल का, असा प्रश्न उभा राहत आहे."

- अनिल बोरनारे, प्रदेश सहसंयोजक, भाजप शिक्षक आघाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांच्या रोड शोला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सॅम करनने उडवला जैस्वालचा त्रिफळा

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

Nashik Fraud Crime : दिले 5 लाख, उकळले 18 लाख! अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

Rohit Sharma: 'मी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झालो, तेव्हा...', रोहितनं नेतृत्व अन् निवृत्तीवर केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT