School sakal media
मुंबई

शाळा सुरू करण्यासाठी 'सेव्ह द चिल्ड्रन’ तर्फे पत्र मोहीम

संजीव भागवत

मुंबई : कोरोना (corona) आणि त्यानंतर शाळा बंद असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये (students) बालमजुरी वाढण्याची भीती (child labour) निर्माण झाली आहे. त्यामुळे ही मुलांची बालमजुरी रोखायची असेल, सरकारने (mva government) वेळेत शाळा सुरू कराव्यात यासाठी ‘सेव्ह द चिल्ड्रन’ (save the children) तर्फे शाळा सुरू करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे.

यात विद्यार्थी, पालक यांनी शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून विनंती करण्याची मोहिम सुरू केली जाणार असून यासाठीचा निर्णय एका आयोजित चर्चासत्रात घेण्यात आला. राज्यात कोरोणा मुळे राज्यात गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत तर अनेक विद्यार्थ्यांना बाल मजुरीचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. यावर तोडगा म्हणून आता लवकरात लवकर शाळा सुरू व्हाव्यात असे शिक्षण, जन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

याबाबत शिक्षण हक्क मंच, मैत्री आणि बालरक्षा भारत यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘सेव द चिल्ड्रन’ अंतर्गत ‘कोविड काळातील शाळाबंदी – शिक्षण-संकट आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा सुरु झाल्या तर मुलांना कोरोना होईल का? त्यांच्या जीवाला काही धोका आहे का ? शाळा सुरु व्हाव्यात असे आपण का म्हणत आहोत? शिक्षण विभागाची भूमिका आणि प्रयत्न काय आहेत? यासाठी आतापर्यंत काय काय प्रयत्न झालेत? आणखी कोणते प्रयत्न आवश्यक आहेत? आपण काय करू शकतो? याबाबत सविस्तर चर्चा झाली. असून त्यात शाळा सुरू करण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या चर्चासत्रात राज्याचे माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे, जनआरोग्य अभियानचे डॉ. अनंत फडके, नॅशनल सेंटर फॉर एज्युकेशन अॅण्ड इमरजन्सीचे गुरुमूर्ती काशिनाथन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे व माजी उपसंचालक शोभा खंदारे, आदर्श गाव योजनेचे कार्यकारी अध्यक्ष पोपटराव पवार, मैत्री संस्थेचे रामेश्वर फड, रवींद्र मराठे, शिक्षण हक्क मंचाच्या हेमांगी जोशी आदी तज्ज्ञ सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT