मुंबई

मुंबईतील शाळा आयुक्तांचे पुढील आदेश येईपर्यंत बंदच; पालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्णय

तेजस वाघमारे

मुंबई  : मुंबईतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. मात्र अन्य देशांमध्ये आलेली कोरोनाची दुसरी लाट आणि अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिका आयुक्तांचे पुढील आदेश मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी या शिक्षण मंडळाना मुंबईमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्यास नुकतेच पालिकेने परवानगी दिली होती. त्याचवेळी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 18 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती. मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने शाळा सुरू करण्यास दुजोरा दिला जात होता. मात्र अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची पसरलेली दुसरी लाट व अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व सर्व विद्यालये 16 जानेवारीपासून मुंबई महापालिका आयुक्तांचे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शाळा बंद ठेवण्याच्या सूचनेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी शिक्षण निरीक्षक, उपशिक्षणाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी (शाळा), पालिका क्षेत्रातील महापालिका प्राथमिक व माध्यमिक, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पालिकेच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मुंबईतील शाळांमध्ये नाराजी आहे. कमीतकमी 9 वी ते बारावीचे वर्ग सुरू करायला हवे होते. कारण मुंबई मधील मुलांचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर सतत होत आहेत. बोर्ड परीक्षेचा अभ्यास तसेच पूर्वतयारीसाठी फक्त तीन महिने मिळणार आहेत. 
-प्रशांत रेडीज, सचिव मुंबई मुख्याध्यापक संघटना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beyond the Hype AI : एआयच्या युगात भारताची भूमिका दुय्यम राहणार? नवोन्मेष आणि संशोधनाची गरज सांगणारे पुस्तक चर्चेत

'हट ना बे...'करीना कपूरने प्रेग्नेंसीच्या चर्चेवर दिलं उत्तर; म्हणाली, ‘तुम लोग तो...’ Viral Video

New Marathi Books : मराठी वाङ्‍मयाचा वारसा आणि वर्तमान ; दुर्मीळ ग्रंथ, ध्यानमार्गदर्शन व स्त्रीमनाच्या कवितांचा नवा पुस्तकमेळा

Marathi News Live Updates : संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूचा दिल्ली पोलीसांकडून सखोल तपास सुरू

AUS vs BAN: बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा ऑस्ट्रेलियाने घेतला बदला! मिचेल स्टार्कचा कहर, अवघ्या २ दिवसांत कसोटी जिंकत १-१ ने बरोबरीत

SCROLL FOR NEXT