मुंबई

इंजेक्शन नाही, शास्त्रज्ञ म्हणतायत अशी असू शकते COVID19 ची लस...

सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोना व्हायरसची दहशत संपूर्ण जगात पसरत चालली आहे. कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या COVID-19 या रोगामुळे जगभरात तब्बल ५५ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही कोरोनावर औषध सापडलं नाहीये. जगभरातले वैज्ञानिक यावर संशोधन करत आहेत. भारतातही कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरु आहे. आणि लवकरच त्याची चाचणी करण्यात येणार आहे असा दावा एका कंपनीने केलाय. 

सध्या भारतात हैदराबादमध्ये कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरु आहे. या लसीची महत्त्वाची बाब म्हणजे ही लस कोणत्याही इंजेक्शन सारखी नाही तर पोलिओ ड्रॉपसारखी दिली जाणार असल्याची माहिती आहे. ही लस तोंडाद्वारे नाही तर नाकाद्वारे शरीरात पोहोचवण्यात येणार आहे.

या लसीचं पूर्ण नाव ‘कोरोफ्ल्यू-वन ड्रॉप कोविड १९ नेजल वॅक्सिन’ असं आहे. हैदराबादमधील मेडिकल कंपनी 'भारत बायोटेक' ही कोरोफ्लू नावाची लस विकसित करत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी ही लस तयार करण्यात येत आहे. इंजेक्शनप्रमाणे ही लस देण्यात येणार नाहीये तर कोरोनाग्रस्तांना नाकाद्वारे ही लस दिली जाणार आहे. नाकाद्वारे एक थेंब कोरोनाग्रस्तांच्या शरीरात सोडण्यात येणार आहे.

ही लस तयार करण्यासाठी भारत बायोटेकनं युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मेडिसन आणि फ्ल्यूजेन या कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. या तीन कंपन्यांचे वैज्ञानिक कोरोनाच्या लसीवर संशोधन करत आहेत. जेव्हा हे औषध एखाद्या  रूग्णाच्या शरीरात जातं तेव्हा त्या रुग्णाच्या शरीरात या व्हायरसशी  लढण्यासाठी अँटीबॉडी तयार होतात असं या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. 

ही लस पूर्णपणे सुरक्षित असणार आहे असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसंच एम २ एसआर बेसवर तयार होणाऱ्या क्लोरोफ्ल्यू औषधात COVID-19 चे जीन सिक्वेन्स मिश्रित करण्यात आले आहेत. त्यामुळे ही लस कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

“आम्ही भारतातच या लसीचं उत्पादन करणार आहोत. त्यापूर्वी त्याची क्लिनिकल ट्रायल घेतली जाईल. त्यानंतर जगभरात वितरणासाठी ३०० दशलक्ष डोस तयार करण्यात येतील.तसंच या वर्षाच्या अखेरपर्यंत मानवांवर याची चाचणी घेण्यात येईल. तोपर्यंत युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मेडिसनमध्ये यावर चाचणी घेण्यात येणार आहे." अशी माहिती कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड डॉ. रॅशेस एला यांनी दिली.

scientist in hyderabad are working on covid19 antidote it will be nasal drops and not injection  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT